कसोटीनंतर भारताबरोबरच्या टी20 मालिकेत झालेल्या पराभवामुळे कर्णधार केविन पीटरसन नाराज आहे. पीटरसनचा असा विश्वास आहे की, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या क्षमतेचा इंग्लंड संघ पूर्णपणे फायदा घेण्यास सक्षम नाही. म्हणूनच, त्याने फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची मागणी केली.
सध्याच्या टी20 मालिकेत बेन स्टोक्स 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. यावेळी त्याला पाच सामन्यांत केवळ तीन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याला 28 च्या सरासरीने 84 धावा करता आल्या.
याबद्दल केविन पीटरसनने आपल्या ट्विटरवर असे लिहिले की, “बेन स्टोक्सने 6 व्या क्रमांकावर खेळणे संघासाठी अजिबात उपयुक्त नाही आणि फावल्या वेळात गोलंदाजी करणेही उपयुक्त ठरत नाही. जॉनी बेअरस्टो टी20 मध्ये योग्य सलामीवीर फलंदाज आहे. जर ते करत नसतील तर स्टोकने 4 नंबरवर फलंदाजी करावी.”
https://twitter.com/KP24/status/1373322401778434061
टी20 मालिकेत इंग्लंडला यजमानांविरुद्ध 3-2 असा पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडचा संघ सुरुवातीपासूनच मालिकेत वर्चस्व गाजवत होता. परंतु असे असूनही, भारताच्या संघाने जोरदार पुनरागमन करत ओएन मॉर्गनच्या संघाला पराभूत केले. या मालिकेदरम्यान नाणेफेक फार महत्वाची मानली जात होती. परंतु, नाणेफेक हारल्यानंतरही प्रथम फलंदाजी करत भारताने अखेरच्या दोन सामन्यात इंग्लंडला पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
मिताली राजची भूमीका साकारत असलेल्या तापसी पन्नूचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सेम टू सेम’
‘कोर्ट हे माझ्यासाठी मंदिर-मशिदीसारखे…’ शमीची पत्नी हसीन जहां यांच्या पोस्टने उडाली खळबळ
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज: इंडिया लिजेंड्सला ऐतिहासिक विजेतेपद, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत