भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठीचा संघ बीसीसीआयने रविवारी दुपारी जाहीर केला. उभय संघांत सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारत 2-0 अशा आघाडीवर आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला होता. पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या डावात संघाने 6 विकेट्स राखून विजय मिळवसा. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या संघात जास्त काही बदल पाहायला मिळाला नाही.
India’s squad for 3rd & 4th Test vs Australia
Rohit Sharma (C), KL Rahul, S Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, R Jadeja, Mohd Shami, Mohd Siraj, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Umesh Yadav, Jaydev Unadkat
— BCCI (@BCCI) February 19, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 मार्च रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच चौथा आणि मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्च रोजी अहमदाबादमध्ये सुरू होईल. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया पूर्ण प्रयत्न करेल. पहिल्या दोन सामन्यांमधील खेळपट्टी पाहता आघामी सामन्यांमध्ये इंदोर आणि अहमदाबादची खेळपट्टी कशा पद्धतीची असेल, हे पाहणे महत्वाचे असेल.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमने सामने येऊ शकतात. ऑस्ट्रेलियन संघाचे अंतिम सामन्यात स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. दुसरीकडे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना जिंकल्यानंतर भारत देखील अंतिम सामन्यात जागा पक्की करू शकतो. रविवारी दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफी मात्र स्वतःकडे कायम ठेवली. ऑस्ट्रेलियान संघाने आता जरी पुढचे दोन्ही सामने जिंकले, तरी मालिका बोरबरीने सुटेल आणि ट्रॉफी भारताकडे कायम राहील. (BGT2023 Indian Squad for last two Tests against Australia)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी धावसंख्या न करताही रोहितच्या नावावर भन्नाट विक्रमाची नोंद, सचिन-हेडनच्या यादीत गाठले तिसरे स्थान
स्वतःची 100वी कसोटी खेळताना पुजाराने मिळवून दिला विजय, याआधी अशी कामगिरी करणारे फक्त…