भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघातूनही बाहेर रहावे लागत आहे. तो सध्या त्याच्या स्पोर्ट्स हार्नियावर उपचार घेत आहे.
त्यामुळे सध्या त्याचे लक्ष केवळ तंदुरुस्त होण्यावर असून तो पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाचा विचार करत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तो त्याच्या दुखापतीबद्दल म्हणाला, शस्त्रक्रियेबद्दल अद्याप काहीही निश्चित झालेले नाही पण स्पोर्ट्स हर्नियाच्या बाबतीत सामान्यत: शस्त्रक्रिया केली जाते. पण तो पुढील आठवड्यात परदेशात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करत आहे.
तसेच या दुखापतीनंतर त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाबद्दल तो म्हणाला, ‘आत्ता मला माहित नाही की मी परत कधी येऊ शकेन. यासाठी कदाचित एक दिवस, एक आठवडा किंवा कदाचीत एक महिना लागू शकतो. हे सर्व दुखापतीचे निदान आणि उपचारांच्या योजनेवर अवलंबून आहे.’
तसेच भारताकडून 236 विकेट्स घेणारा भुवनेश्वर म्हणाला, ‘मला क्रिकेट खेळायचं आहे. आत्ता, मी पूर्णपणे यापासून दूर आहे. मी फक्त परत क्रिकेट खेळण्याची वाट पाहत आहे. कधीकधी यामुळे निराशा येऊ शकते.’
त्याचबरोबर पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाबद्दल भुवनेश्वर म्हणाला, ‘मी सध्या विश्वचषकाबद्दल विचार करत नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मी विश्वचषकासाठी दुखापत मुक्त असेल.’
तो म्हणाला, ‘माझे पहिले लक्ष्य हे तंदुरुस्त होण्याकडे आहे. एकादा मी पुनरागमन केले की मी विश्वचषकासाठी योजना आखण्यास सुरुवात करेल.’
भुवनेश्वर ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतीय संघातून स्नायूमध्ये ताण आल्याने बाहेर पडला होता. पण त्यानंतर त्याने याच महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून पुनरागमन केले होते. मात्र पुन्हा एकदा तो दुखापतग्रस्त झाला.
चार आयपीएल जिंकणाऱ्या षटकार किंग रोहित शर्माला या संघातून डावलले
वाचा????https://t.co/YQT5LobsPl????#म #मराठी #Cricket #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) December 30, 2019
तो दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
वाचा????https://t.co/LivOyJwuzj????#म #मराठी #Cricket #MSDhoni @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) December 30, 2019