Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिग ब्रेकिंग! कर्णधार रोहित शर्मा ‘या’ सामन्याला मुकणार, पाहा काय आहे कारण

बिग ब्रेकिंग! कर्णधार रोहित शर्मा ‘या’ सामन्याला मुकणार, पाहा काय आहे कारण

February 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-Test

Photo Courtesy: Twitter/ICC


नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. दिल्ली कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने धूळ चारत मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. अशात उर्वरीत दोन कसोटी सामन्यांचे आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) जाहीर केले. मात्र, वनडे मालिकेतील एका सामन्याला रोहित शर्मा मुकणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रोहित शर्मा पहिल्या वनडेला मुकणार
बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पुढील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पहिल्या वनडे सामन्याला मुकणार असल्याचेही बीसीसीआयने ट्वीटमध्ये नमूद केले आहे. रोहित शर्मा पहिल्या वनडेला (Rohit Sharma First ODI) मुकण्याची माहिती सांगताना बीसीसीआयने त्याच्या कुटुंबाचे कारण दिले. बीसीसीआयने ट्वीट करत म्हटले की, “रोहित शर्मा हा त्याच्या कौटुंबिक कारणास्तव पहिल्या वनडे सामन्यासाठी अनुपस्थित असेल.”

𝗡𝗢𝗧𝗘: Mr Rohit Sharma will be unavailable for the first ODI due to family commitments and Mr Hardik Pandya will lead the side in the first ODI.

— BCCI (@BCCI) February 19, 2023

कोण करणार पहिल्या वनडेचे नेतृत्व?
याच ट्वीटमध्ये त्यांनी पहिल्या वनडेतील कर्णधाराविषयीही सांगितले. त्यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, “हार्दिक पंड्या हा पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करेल.” अशात रोहितच्या अनुपस्थितीत वनडे संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसणार आहे. (Big Breaking! Captain Rohit Sharma will miss ‘this’ match know the reason)

India’s ODI squad vs Australia

Rohit Sharma (C), S Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul, Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), R Jadeja, Kuldeep Yadav, W Sundar, Y Chahal, Mohd Shami, Mohd Siraj, Umran Malik, Shardul Thakur, Axar Patel, Jaydev Unadkat

— BCCI (@BCCI) February 19, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

India’s squad for 3rd & 4th Test vs Australia

Rohit Sharma (C), KL Rahul, S Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, R Jadeja, Mohd Shami, Mohd Siraj, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Umesh Yadav, Jaydev Unadkat

— BCCI (@BCCI) February 19, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: ॲास्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मोठ्या खेळाडूचं कमबॅक
मोठी धावसंख्या न करताही रोहितच्या नावावर भन्नाट विक्रमाची नोंद, सचिन-हेडनच्या यादीत गाठले तिसरे स्थान


Next Post
Ravindra-Jadeja-And-Sachin-Tendulkar

जडेजाच्या नावे आणखी एक विक्रम! आता विराटला पछाडत बसला थेट सचिनच्या मांडीला मांडी लावून

Photo Courtesy:Twitter

प्रत्येक वेळी दिल्लीत 'झाडू' नाही चालत! तथाकथित ब्रह्मास्त्रानेच केला ऑस्ट्रेलियाचा घात

Photo Courtesy: Twitter/ ICC

केएल राहुलला पुन्हा मिळाली कसोटीत संधी, चाहते म्हणताय….

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143