आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा जवळ आला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी जगभरातील क्रिकेट संघ वनडे क्रिकेट खेळण्यावर भर देत आहेत. अशातच सप्टेंबरच्या अखेरीस होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडने संघाची घोषणा केली आहे. हैराण करणारी बाब अशी की, वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला या संघाचा कर्णधार निवडले गेले आहे. संघात अधिकतर युवा खेळाडूंना सामील करण्यात आले आहे.
‘या’ खेळाडूंना विश्रांती
या मालिकेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे. टॉम लॅथम, डेवॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर आणि टीम साऊदी यांसारखे स्टार खेळाडू या वनडे मालिकेचा भाग नसतील.
Lockie Ferguson is set to captain the BLACKCAPS for the first time in an international fixture during the upcoming three match ODI Series against @BCBtigers at Sher-e-Bangla National Cricket Stadium. The first ODI is on September 21st. More | https://t.co/sMQZif3SjX #BANvNZ pic.twitter.com/NpOarSuy5a
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 1, 2023
सध्या इंग्लंड दौऱ्यावर
न्यूझीलंड संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची वनडे आणि तितक्याच सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. न्यूझीलंड संघाचा हा दौरा 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड संघ बांगलादेशसाठी रवाना होईल. न्यूझीलंड संघाचा बांगलादेश दौरा दोन भागात विभागला गेला आहे. दोन्ही संघांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र, हा कसोटी सामना विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेनंतर खेळला जाणार आहे.
दिग्गज खेळाडू विलियम्सन बाहेर
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन याला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात सामील केले गेले नाहीये. कारण, तो अद्याप पूर्णपणे फिट नाहीये. दुसरीकडे, मार्क चॅपमॅन आणि जिमी नीशम वैयक्तिक कारणांमुळे निवडीसाठी उपलब्ध राहिले नव्हते. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यावर पूर्णपणे नवखा संघ निवडला गेला आहे. फलंदाजी प्रशिक्षक ल्यूक राँची मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतील. कारण, गॅरी स्टीड विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. खास बाब अशी की, दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडले गेले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
लॉकी फर्ग्युसन (कर्णधार), फिन ऍलन, चॅड बोवेस, विल यंग, टॉम ब्लंडेल, डीन फॉक्सक्रॉफ्ट, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, कोल मॅककॉनची, डेन क्लीव्हर, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, ट्रेंट बोल्ट (big news new zealand named their squad for bangladesh odi series see here)
हेही वाचाच-
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य
जाळ अन् धूर संगटच! मार्शच्या झंझावाती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेने गमावली मालिका