चार वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविणारा रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांच्याकडे एक युवा आणि अनुभवी संघ आहे. परंतु आयपीएल 2020 पूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे.
सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या यशाचा मुख्य दुवा आहे. परंतु, वैयक्तिक कारणे सांगून त्याने स्पर्धेतून माघार घेतली. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात मलिंगाने अंतिम षटक चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध फेकले होते. त्याच्या अनुपस्थितीत, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर दबाव जास्त असेल. अशा परिस्थितीत युएईमध्ये खेळताना सर्वात मोठे आव्हान काय असेल ते ट्रेंट बोल्टने सांगितले.
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट म्हणाला की, “आयपीएलच्या 13 व्या हंगामात सर्व संघांसाठी सर्वात मोठे आव्हान इथली उष्ण आणि दमट परिस्थिती आहे.”
गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा बोल्ट पहिल्यांदाच या चॅम्पियन संघात सामील झाला आहे. मलिंगाने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्याला संघात मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.
नव्या संघात सामील होण्याविषयी बोल्ट म्हणाला की, “कोणत्याही गोलंदाजाला मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीविरूद्ध न खेळणे ही दिलासा देणारी गोष्ट असेल.”
मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बोल्ट म्हणाला की, “आमचे सर्वात मोठे आव्हान 45 अंश सेल्सिअस तापमानात वाळवंटातील मध्यभागी स्वत: ला तयार करणे असेल. मी न्यूझीलंडच्या एका लहानशा देशातून आलो आहे जिथे हिवाळा असतो. यावेळी तिथे तापमान सात किंवा आठ अंशांच्या आसपास आहे.”
तो म्हणाला, “अर्थातच मी इतर काही फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. परंतु मी या मुंबई कुटुंबाचा भाग होण्यासाठी खूप उत्साही आहे. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगायचं झालं, तर जेव्हा तुम्ही अशा बळकट संघाविरुद्ध खेळता, तेव्हा आव्हान धडकी भरवणार असते. या वेळी या शांत गटाचा एक भाग असणे चांगले आहे.”
युएईमध्ये क्रिकेट खेळलेला बोल्ट म्हणाला की, त्याच्या संघाच्या गोलंदाजीमध्ये कोणत्याही विरोधी संघाला पराभूत करण्याची ताकद आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी येथे थोडे क्रिकेट खेळले आहे आणि मला माहीत आहे की परिस्थिती येथे बर्याच प्रमाणात बदलू शकते. मला आशा आहे की येथे खेळपट्ट्या चांगल्या आहेत. कोणत्याही विरोधी संघाला पराभूत करण्याचे कौशल्य आमच्यात आहे.”
📹 Exclusive: Trent Boult's first interview on MITV ⚡💙#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @trent_boult pic.twitter.com/xyuZr67xVr
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2020
आयपीएल 2020 चा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. यावर्षी कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळली जात असून अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-खुशखबर: मार्चनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळणार प्रेक्षकांचा जल्लोष, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने…
-आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद
-माजी दिग्गजही झाला विंडीजच्या ‘या’ खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!
-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान