रविवारी (1 जानेवारी) नवीन वर्ष सुरू होत आहे. मागच्या वर्षी क्रिकेटमध्ये अनेक नवे विक्रम बनले, तर अनेक दिग्गजांचे जुने विक्रम देखील मोडीत निघाले. 2022 मध्ये आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकासारख्या प्रमुख स्पर्धा देखील खेळल्या गेल्या. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, मार्नस लाबुशेन, रिषभ पंत, अर्शदीप सिंह, हारिस रऊफ, बाबर आजम, सॅम करन, सिकंदर रजा आणि जोस बटलर यांसारख्या खेळाडूंनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
हे सर्व खेळाडू त्यांच्या त्यांच्या संघासाठी मॅच विनरच्या भूमिकेत कामगिर करताना दिसले. या खेळाडूंच्या नावावर देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही महत्वपूर्ण विक्रमांची नोंद झाली आहे. आपण या खेळात 2022 मध्ये झालेल्या सर्वात मोठ्या भागीदाऱ्यांवर नजर टाकणार आहोत. चला तर नजर टाकू 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाच सर्वोत्तम भागीदाऱ्यांवर (biggest partnership in 2022).
5. फिल साल्ट आणि डेविड मलान
2022 मध्ये पाचवी सर्वात मोठी भागीरादी इंग्लंडचा फिल साल्ट (Phil Salt) आणि डेविड मलान (Dawid Malan) यांच्यात झाली. या दोन्ही फलंदाजांनी नेदरलँड्सविरुद्धच्या वनेड सामन्यात 222 धावांची भागीदारी केली होती. वनडे मालिकेतील हा दुसरा सामना असून यामध्ये साल्टने 122 तर मलानने 86 धावा केल्या होत्या. या दोघाच्या या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना 232 धावांनी जिंकला.
4. स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर
2022 मधील चौथी सर्वात मोठी भागीदारी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांच्यात झाली. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) कसोटी सामन्यात ही भागीदारी केली. उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नर आणि स्मिथ यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 239 धावांची भागीदारी झाली. वॉर्नरने 144 आणि स्मिथने 84 धावांची खेळी केली. या दोघांच्या या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना 182 धावांनी जिंकला.
3. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक
2022 मधील तिसरा सर्वात मोठी भागीदारी पाकिस्तानच्या अब्दुल्हा शफीक (Abdullah Shafique) आणि इमाम उल हक (Imam-ul-Haq) यांच्यात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात शफीक आणि इमाम उल हक यांच्यातील ही भागीरादीर चाहत्यांना पाहायला मिळाली.252 धावांच्या या भागीदारीमध्ये इमामने 111, तर शफिकने 136 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अनिर्णीत राहिला.
2. डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड
वर्षातील दुसरा सर्वात मोठी भागीदारी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि त्यांचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड () यांच्यात झाली. 22 नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनेड सामन्यात या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियन संघासाठी 269 धावांचे योगदान दिले. यात हेटच्या 152, तर वॉर्नरच्या 106 धावांचा समावेश होता. उभय संघांतील या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती, मात्र ऑस्ट्रेलियाने 221 धावांनी विजय मिळवला.
1. ईशान किशन आणि विराट कोहली
2022 मध्ये सर्वात मोठी भागीदारी भारताचा दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) यांच्यात पाहायला मिळाली. बांगलादेशविरुद्ध 10 डिसेंबर रोजी वनडे सामन्यात ही भागीदारी पार केली, जी वर्षातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. दोघांनी भारतासाठी या सामन्यूत एकूण 290 धावांचे योगदान दिले. इशान किशनने 200, तर विराटने 87 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 227 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अपघातग्रस्त पंतनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार, ‘या’ खेळाडूंची नावे चर्चेत
गुड बाय 2022 | क्रिकेटच्या मैदानात यावर्षी सर्वाधिक गाजलेले 6 वाद, यादीत दग्गजांचा समावेश