fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

Video: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊटचा किस्सा पहाच

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये (बीबीएल) रविवारी झालेल्या सिडनी थंडर विरुद्ध एडलेड स्ट्रायकर्स सामन्यात बीली स्टनलेक एका गंमतीदार पद्धतीने बाद झाला.

दुसऱ्या डावाच्या 17व्या षटकावेळी ही घटना घडली. यावेळी थंडरनने स्ट्रायकर्ससमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्टनलेक हा स्ट्रायकर्सचा शेवटचा खेळाडू होता.

त्याने डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर एक धाव घेत असताना दुसरी धाव घेण्यास पळाला असताना त्याची बॅट खेळपट्टीवर अडकून बसली. यावेळी त्याने बॅट तेथेच सोडत धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाद झाला. असे करताना त्याचे डोके मात्र रेषेच्याही पुढे गेले होते.

या सामन्यात थंडरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 168 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शेन वॉटसनने सर्वाधिक 68 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या स्ट्रायकर्सचा संघाची सुरूवात वाईट झाली. यामध्ये स्ट्रायकर्सकडून कोलिन इंग्रामने सर्वाधिक 48 धावा केल्या. मात्र 17.4 षटकातच ते 97 धावांवर सर्वबाद झाले. हा सामना थंडरने 71 धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

त्या फलंदाजाच्या बाद होण्यावर उभा राहिला मोठा वाद, काय झाले नक्की?

कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित

होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला

You might also like