भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा आज 37 वा वाढदिवस आहे. भारताचा निर्भीड सलामीवीर फलंदाज म्हणून गंभीरला ओळखले जाते. तो जसा मैदानावर निर्भीड आहे, तसाच तो मैदानाबाहेरही आहे.
भारताला 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली होती.
भारताला मोठे विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या गंभीरबद्दल या खास गोष्टी-
-14 आॅक्टोबर 1881 ला गंभीरचा दिल्ली येथे जन्म झाला.
-त्याच्या जन्माच्या 18 दिवसांनतर त्याला त्याच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतले. त्यानंतर तो त्यांच्याकडेच राहिला आणि लहानाचा मोठा झाला आहे.
-गंभीर त्याचे मामा पवन गुलाटी यांना मार्गदर्शक मानतो. तो 90 च्या दशकात क्रिकेट शिकत असताना त्यांच्या घरी राहत होता. तसेच तो अनेकदा महत्त्वाच्या सामन्यांआधी त्यांना फोन करतो.
-गंभीरने 1999-00 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अनेकांना प्रभावीत केले होते. त्याने पहिल्या दोन सामन्यातच 136 धावा केल्या होत्या.
-त्यानंतर त्याचे 2000 मध्ये बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली. तिथे भारतीय संघात स्थान मिळवण्याची क्षमता असणाऱ्या युवा क्रिकेटपटूंना ट्रेनिंग दिली जाते.
-2007 ला झालेल्या वनडे विश्वचषकात गंभीरचा समावेश करण्यात आलेला नव्हता. पण त्यानंतर भारताने त्याला पहिल्या टी20 विश्वचशषकासाठी भारतीय संघात स्थान दिले. या विश्वचषकात मात्र गंभीरने दमदार कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला.
त्याने या विश्वचषकात अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 54 चेंडूत 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
Here's wishing @GautamGambhir a very happy birthday 🎂💐
Here's a fine knock from GG against Sri Lanka at Kolkata #HappyBirthdayGG pic.twitter.com/d4t77Yd4iU
— BCCI (@BCCI) October 14, 2018
-त्यानंतर चार वर्षांनी 2011 ला झालेल्या वनडे विश्वचषकातही अंतिम सामन्यातील गंभीरने केलेल्या 97 धावा आणि एमएस धोनी बरोबर केलेली 109 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली होती. या विश्वचषकात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता.
-गंभीरला 2008 मध्ये अर्जून पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 2009 मध्ये त्याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्याला यावर्षी आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कारही देण्यात आला होता.
10,324 international runs for 🇮🇳
75 in the @WorldT20 2007 final 🏆
97 in the @cricketworldcup 2011 final 🏆Happy 37th birthday @GautamGambhir! pic.twitter.com/3wlnzOAs8B
— ICC (@ICC) October 14, 2018
-गंभीरने कसोटीत सलग 11 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. असे फक्त सर व्हिव रिचर्ड्स यांनी केले होते. पण त्यानंतर विरेंद्र सेहवागने या विक्रमाची बरोबरी केली आणि नंतर 2014 मध्ये एबी डिविलियर्सने सलग 12 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करत हा विक्रम मोडला.
-भारतीय संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली एकदाही पराभूत झालेला नाही. त्याने 2010-2011 च्या दरम्यान भारताचे 6 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. या सहाही वनडे सामन्यात भारत पराभूत झालेला नाही.
-गंभीरने मैदानाबाहेरही अनेक सामाजिक काम केले आहे. त्याने अनेकदा जवानांच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच त्याने छत्तीसगढ़ आणि झोहरामधील सीआरपीफच्या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
-सौरव गांगुली होस्ट असलेल्या कोन बनेगा करोडपतीच्या बंगाली वर्जनमध्ये गौतम गंभीर पाहुणा म्हणून 2011 मध्ये उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याने 25 लाख रुपये जिंकले होते.
-गंभीरने 2008 मध्ये आयपीेलची सुरुवात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून केली. त्यानंतर त्याला 2011 मध्ये कोलकता नाईट रायडर्सने संघात सामील करुन घेतले. त्यानंतर त्याने कोलकताचे नेतृत्व करताना दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच पुन्हा एकदा 2018 च्या आयपीएलमध्ये तो दिल्लीकडून खेळला.
-गंभीरने आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 कसोटी सामन्यात 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. तसेच 147 वनडे सामन्यात 5238 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गंभीरने 37 टी 20 सामने भारताकडून खेळताना 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- विंडिज विरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉच्या कुटुंबाला मनसेकडून धमक्या
- धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं
- कसोटी सामना सुरु असतानाच रोहित शर्माचे नाव या संघाच्या प्लेयिंग ११ मध्ये