भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा आज (14 ऑक्टोबर) 41 वा वाढदिवस आहे. भारताचा निर्भीड सलामीवीर फलंदाज म्हणून गंभीरला ओळखले जाते. तो जसा मैदानावर निर्भीड आहे, तसाच तो मैदानाबाहेरही आहे.
भारताला 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली होती.
भारताला मोठे विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या गंभीरबद्दल या खास गोष्टी-
-14 ऑक्टोबर 1981 ला गंभीरचा दिल्ली येथे जन्म झाला.
-त्याच्या जन्माच्या 18 दिवसांनतर त्याला त्याच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतले. त्यानंतर तो त्यांच्याकडेच राहिला आणि लहानाचा मोठा झाला आहे.
-गंभीरने 1999-00 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अनेकांना प्रभावीत केले होते. त्याने पहिल्या दोन सामन्यातच 136 धावा केल्या होत्या.
-त्यानंतर त्याची 2000 मध्ये बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली. तिथे भारतीय संघात स्थान मिळवण्याची क्षमता असणाऱ्या युवा क्रिकेटपटूंना ट्रेनिंग दिली जाते.
10,324 international runs for 🇮🇳
75 in the @WorldT20 2007 final 🏆
97 in the @cricketworldcup 2011 final 🏆Happy 37th birthday @GautamGambhir! pic.twitter.com/3wlnzOAs8B
— ICC (@ICC) October 14, 2018
-2007 ला झालेल्या वनडे विश्वचषकात गंभीरचा समावेश करण्यात आलेला नव्हता. पण त्यानंतर भारताने त्याला पहिल्या टी20 विश्वचशषकासाठी भारतीय संघात स्थान दिले. या विश्वचषकात त्याने दमदार खेळ करताना 6 सामन्यात 227 धावा केल्या. तो भारताचा या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
त्याने या विश्वचषकात अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 54 चेंडूत 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. हा सामना भारताने जिंकत पहिला टी20 विश्वचषकही जिंकला होता.
-त्यानंतर चार वर्षांनी 2011 ला झालेल्या वनडे विश्वचषकातही अंतिम सामन्यातील गंभीरने केलेल्या 97 धावा आणि एमएस धोनी बरोबर केलेली 109 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली होती. या विश्वचषकात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता.
#OnThisDay in 2011, India lifted their second @cricketworldcup! A brilliant hundred from Mahela Jayawardene wasn't enough as @GautamGambhir soaked in the pressure for his 97 and MS Dhoni finished it off in style!
Can India regain the trophy at #CWC19? pic.twitter.com/FQuJE0qTnE
— ICC (@ICC) April 2, 2019
-गंभीरला 2008 मध्ये अर्जून पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 2009 मध्ये त्याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्याला 2009 यावर्षी आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कारही देण्यात आला होता.
Wishing @GautamGambhir a very Happy Birthday 🎂🎂
Here's a throwback to one of his memorable innings in a run-chase against Sri Lanka in 2009 #HappyBirthdayGautamGambhir pic.twitter.com/uHgH8Tq8YO— BCCI (@BCCI) October 14, 2019
-भारतीय संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली वनडेत एकदाही पराभूत झालेला नाही. त्याने 2010-2011 च्या दरम्यान भारताचे 6 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. या सहाही वनडे सामन्यात भारत पराभूत झालेला नाही.
-गंभीरने मैदानाबाहेरही अनेक सामाजिक काम केले आहे. त्याने अनेकदा जवानांच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
One of only four players to have scored centuries in five consecutive Tests 👏
Happy birthday Gautam Gambhir 🎂 pic.twitter.com/JfPkXuAmzT
— ICC (@ICC) October 14, 2019
-सौरव गांगुली होस्ट असलेल्या कोन बनेगा करोडपतीच्या बंगाली वर्जनमध्ये गौतम गंभीर पाहुणा म्हणून 2011 मध्ये उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याने 25 लाख रुपये जिंकले होते.
-गंभीरने 2008 मध्ये आयपीेलची सुरुवात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून केली. त्यानंतर त्याला 2011 मध्ये कोलकता नाईट रायडर्सने संघात सामील करुन घेतले. त्यानंतर त्याने कोलकताचे नेतृत्व करताना दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच पुन्हा एकदा 2018 च्या आयपीएलमध्ये तो दिल्लीकडून खेळला.
– गंभीरने डिसेंबर 2018 मध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-गंभीरने आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 कसोटी सामन्यात 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. तसेच 147 वनडे सामन्यात 5238 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गंभीरने 37 टी 20 सामने भारताकडून खेळताना 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत.
– गंभीरने निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. तो सध्या दिल्लीमध्ये खासदार आहे.
This is for all the supporters of Indian cricket and my critics. Both have played a part in my journey…some day will discuss who played more than the other @BCCI #padmashriaward pic.twitter.com/zrMrAEikKB
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) March 16, 2019
-गंभीरला 2019 ला पद्मश्री पुरस्कारानेही गौरव करण्यात आला.
– गंभीर पूर्व दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून कार्यरत आहे.
– नुकतेच गंभीरला आयपीएलमधील सुपर जायंट्स ग्रुपचे ग्लोबल मेंटर म्हणून नियुक्त केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश