दिग्गज आणि महान हॉकीपटू म्हणून ओळखले जाणारे धनराज पिल्ले यांनी हॉकी क्षेत्रात अनेक मोठे विक्रम केले आहेत. धनराज पिल्ले हे असे दिग्गज आहेत, जे फक्त खेळासाठी जगतात. हाच महान खेळाडू आज म्हणजेच 16 जुलै रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.
धनराज पिल्ले यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात तुटलेल्या हॉकी स्टिकने केली होती. परंतु नंतर ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार बनले आणि त्यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीने यशाची नवीन उंची गाठली.
धनराज पिल्ले यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांना एकूण पाच भाऊ आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे हॉकी स्टिक म्हणून लाकडी काठ्यांचा वापर करत त्यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. 1989 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे जवळजवळ 15 वर्षे त्यांनी हॉकी खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले. सन 2000 मध्ये धनराज पिल्ले यांनी दिलेल्या योगदानामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
धनराज हे असे एकमेव खेळाडू आहेत, ज्यांनी चार ऑलिम्पिक (1992, 1996, 2000, 2004), चार विश्वचषक (1990, 1994, 1998, 2002), चार चँपियन्स ट्रॉफी (1995, 1996, 2002, 2003) आणि चार एशियन गेम्स (1990, 1994, 1998, 2002) जिंकले आहेत.
The only player to play in ????
4️⃣ Olympics
4️⃣ World Cups
4️⃣ Champions Trophies
4️⃣ Asian GamesFrom scoring innumerable goals to inspiring youngsters, wishing a very #HappyBirthday to Dhanraj Pillay. ????#IndiaKaGame pic.twitter.com/epfAMZxEKR
— Hockey India (@TheHockeyIndia) July 16, 2021
धनराज हे भारतीय हॉकी संघाचे उत्कृष्ट फॉरवर्ड होते. धनराज यांच्याकडे चपळता आणि विरोधी संघाला चोप देण्याची कला होती. त्यांनी भारताकडून एकूण 339 सामने खेळले आणि 170 गोल केले आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त त्यांनी भारतीय जिमखाना, सेलेंगोर एचए, मराठा वॉरियर्स, कर्नाटक लायन्स आणि इंडियन एअरलाइन्स या संघांची प्रतिनिधित्व केले आहे.
धनराज हे त्यांच्या कामगिरीशिवाय आपल्या अनोख्या अंदाज आणि रागीट स्वभावामुळे देखील अनेक वेळा चर्चेत आले आहेत. त्यांनी हॉकी व्यवस्थापनाविरूद्ध अनेकदा आपला संतापही दर्शविला आहे. 1998 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांनी संघाला परदेशी दौर्यांवर संघांना कमी फी दिल्यामुळे विरोध केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर
शाम मस्तानी, मदहोश… टीम इंडियाच्या ‘कान्हा’चे बासरीवादन तुम्हालाही करेल मंत्रमुग्ध; एकदा ऐकाच
दिपक हुड्डाच्या निर्णयाने उडाली खळबळ, कृणाल पंड्यानं केलेल्या अपमानानंतर सोडला संघ