Loading...

आज आहेत या दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस!

२०१७मध्ये इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक गाजवणाऱ्या महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या दोन खेळाडूंचा आज(२४ ऑगस्ट) वाढदिवस आहे. पूनम यादव आपला २८वा वाढदिवस आज साजरा करत असून दीप्ती शर्मा २२वा वाढदिवस साजरा करत आहे.

दीप्ती शर्मा:
२२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचा जन्म हा सहारणपूर, उत्तरप्रदेश मधील असून तिने भारताकडून आजपर्यंत ४८ वनडे आणि ३० टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने १३८० धावा केल्या असून ५६ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात १९७ धावा आणि २८ बळी घेतले आहेत.

याबरोबरच महिला वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने आयर्लंड विरुद्ध २०१७ मध्ये वनडेत १८८ धावा केल्या होत्या. तसेच यावेळी तिने पुनम राऊत बरोबर पहिल्या विकेटसाठी ३२० धावांची भागादीरी केली होती. महिला वनडेमधील कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च धावांची भागीदारी आहे.

पूनम यादव:
२८ वर्षीय फिरकी गोलंदाज पूनम यादवचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेशचा असून तिने भारताकडून १ कसोटी, ४१ वनडे आणि ५४ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने ७३ धावा केल्या असून ६३ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात १२ धावा आणि ७४ बळी घेतले आहेत.

Loading...

तसेच ती महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी भारतीय गोलंदाज आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने केली अँडरसन, अश्विनच्या विक्रमाची बरोबरी

६७ धावावंर सर्वबाद होत इंग्लंडने मोडला ११२ वर्षांचा नकोसा विक्रम

रहाणेने सांगितले अश्विनला ११ जणांच्या टीम इंडियात संधी न देण्यामागील कारण

Loading...
You might also like
Loading...