Loading...

२००३ विश्वचषकात ७ ओव्हरमध्ये ६७ धावा ते २०११ ला ३ मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा आज बड्डे

आज(7 ऑक्टोबर) भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानचा 41 वा वाढदिवस आहे. 2003 विश्वचषकात अंतिम सामन्यात 7 षटकामध्ये 67 धावा ते 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 3 निर्धाव षटके असा प्रवास करणाऱ्या झहिरने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत.

Loading...

झहिरने 2000 ला केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 610 विकेट्स घेतल्या. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

अशा या गोलंदाजाबद्दल या काही खास गोष्टी – 

Loading...
Loading...

– झहीरचा जन्म शिर्डीपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीरामपूर येथे झाला. त्याचे वडील फोटोग्राफर होते तर आई शिक्षिका होती.

– त्याने त्याचे शिक्षण हिंद सेवा मंडळाच्या मराठी प्राथमिक शाळेतून केले आणि नंतरचे शिक्षण केजे सोमय्या माध्यमिक शाळेतून केले. शालेय शिक्षणानंतर त्याला मॅकेनिकल इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळाला होता. मात्र त्याच्या प्रशिक्षक सुधीर नाईक यांनी त्याला क्रिकेटवर लक्ष देण्यास सांगितले.

-झहीरला वयाच्या 17 व्या वर्षी त्याचे वडील मुंबईला घेऊन आले. त्यानंतर त्याने मुंबईत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्याने एका अंतिम सामन्यात शिवाजीपार्क जिमखाना विरुद्ध 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला मुंबई क्रिकेटमध्ये ओळख मिळाली. त्यानंतर त्याने मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात निवडही झाली.

-झहीरने 1999-2000 या देशांतर्गत मोसमातून बडोबा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने 8 सामन्यात 35 विकेट्स मिळवल्या.

– त्यानंतर जहिरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर 2003 ला कारकिर्दीतील पहिला विश्वचषक खेळला. पण हा विश्वचषकाचा शेवट त्याच्यासाठी वेदनादायी ठरला.

त्याने अंतिम सामन्यात त्याने पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाला तब्बल 15 धावा दिल्या. त्याने या सामन्यात एकून 7 षटके गोलंदाजी करताना तब्बल 67 धावा दिल्या. या संपूर्ण विश्वचषकात त्याने 11 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या.

– त्यानंतर मात्र त्याने 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रभावी गोलंदाजी करताना 10 षटकांपैकी 3 निर्धाव षटके टाकली आणि 2 विकेट्सही घेतल्या. या विश्वचषकात तो शाहिद आफ्रिदीसह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. त्याने 9 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या.

– झहीर 2006 मध्ये वॉर्सेस्टरशायरबरोबर कौउंटी क्रिकेटही खेळला. त्याने या कौउंटी क्रिकेटमध्ये 5 महिन्यांच्या कालावधीत प्रभावी गोलंदाजी करताना पहिल्याच सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो वॉर्सेस्टरशायरकडून पदार्पणात 10 विकेट्स घेणारा 100 वर्षातील पहिलाच खेळाडू ठरला. त्या मोसमात त्याने 78 विकेट्स घेतल्या.

– झहिरने त्याच्या कारकिर्दीत आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स(दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे.

-झहिरने 2004 ला बांगलादेश विरुद्धच्या कसोटीच 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 75 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या 11 व्या क्रमांकाच्या खेळाडूने केलेल्या सर्वोच्च धावा होत्या. हा विक्रम नंतर वेस्ट इंडीजच्या टीनो बेस्ट आणि ऑस्ट्रेलियाच्या ऍश्टोन एगारने मोडला. त्यावेळी झहिरने सचिन तेंडूलकरबरोबर 10 विकेटसाठी 133 धावांची भागीदारीही केली होती.

– झहीर सचिन तेंडूलकरला आदर्श मानतो. तसेच तो टेनिस स्टार रॉजर फेडररचाही चाहता आहे.

– झहीरने मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाडगेबरोबर 2017 मध्ये लग्न केले आहे.

– झहीरचे पुण्यात “ZK’s” नावाने रेस्टॉरंटदेखील आहे.

Loading...
You might also like