Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेन्नईयन एफसीने कमबॅक केले, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

चेन्नईयन एफसीने कमबॅक केले, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

December 20, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Kerala Blasters FC

Photo Courtesy: Twitter/ Kerala Blasters FC


चेन्नईयन एफसीला हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल)मध्ये घरच्या मैदानावर विजय मिळवता आलेला नाही. केरळा ब्लास्टर्सने २३व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली, परंतु दुसऱ्या हाफमध्ये यजमानांनी बरोबरीचा गोल केला. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही दोन्ही संघांना विजयी गोल करता आला नाही. सहल अब्दुल समदने ब्लास्टर्ससाठी, तर व्हीन्सी बरेट्टोने चेन्नईयनसाठी गोल केला. ब्लास्टर्सच्या सलग पाच विजयांच्या मालिकेला चेन्नईयनने आज ब्रेक लावला. हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. 

चेन्नईयनला यंदाच्या पर्वात घरच्या मैदानावर  5 पैकी केवळ एक सामना त्यांना जिंकता आलेला आहे. 50व्या  सेकंदाला एड्रियन लुनाने मिळालेल्या फ्री किकवर 24 यार्डावरून थेट गोलपोस्टच्या दिशेने चेंडूला ऑन टार्गेट दिशा दिली. चेन्नईयनचा गोलरक्षक देबजित मजुमदारने तो रोखला. 12व्या मिनिटाला व्हीन्सी बरेट्टो चेंडू गोलपोस्टच्या अगदी जवळ घेऊन पोहोचला होता अन् फक्त एक किक चेन्नईयनला आघाडी मिळवून दिली असती. पण, बरेट्टो 6 यार्डावरून गोल करण्यापासून चूकला त्याच्या पायाचा चेंडूला स्पर्शच झाला नाही आणि केरळा ब्लास्टर्सच्या बचावपटूंनी चेंडू दूर केला. 21व्या मिनिटाला लुनाने 40 मीटरवरून पुन्हा एक सुरेख ऑन टार्गेट प्रयत्न केला, मजुमदारने हवेत झेपावत तो रोखला.

केरळा ब्लास्टर्सला 23व्या मिनिटाला यश मिळाले. इव्हान कलियुझनीच्या पासवर सहल अब्दुल समदने चतुराईने गोल केला. चेंडू रोखण्यासाठी पुढे आलेल्या गोलरक्षक मजुमदारला समदे चकवले अन् चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. 26व्या मिनिटाला दिमित्रिओस डिएमांटाकोसने ब्लास्टर्सची आघाडी दुप्पट केली असती, परंतु समदला योग्य पास देता आला नाही. चेन्नईयनचा 28व्या मिनिटाला गोल निशू कुमारने हेडरद्वारे रोखला. 35व्या मिनिटाला वाफा हखामानेशीने हेडरद्वारे चेन्नईयनसाठी आणखी एक बरोबरीची संधी गमावली. दोन्ही संघांचा खेळ चांगला झाला, पण 1 गोलमुळे व 4 ऑन टार्गेट प्रयत्नांमुळे ब्लास्टर्स वरचढ ठरले. चेन्नईयनने बरोबरीच्या काही सोप्या संधी गमावल्या.

पहिल्या हाफमध्ये गमावलेली संधीची भरपाई व्हीन्सी बरेट्टोने मध्यंतरानंतर लगेच केली आणि 48व्या मिनिटाला भन्नाट गोल करून चेन्नईयनला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. घरच्या मैदानावर चेन्नईयनला ब्लास्टर्सकडून एकदाही हार पत्करावी लागलेली नाही. दुसऱ्या हाफमध्ये चेन्नईयनचा खेळ अधिक आक्रमक झालेला पाहायला मिळाला. 60व्या मिनिटाला पीटर स्लिस्कोव्हिचने चेन्नईयनला दुसरा गोल मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु रेफरीने ऑफ साईडचा फ्लॅग उचलला. रिप्लेत तो ऑफ साईड असल्याचे दिसत नव्हता. चेन्नईयनचे खेळाडू अधिक आत्मविश्वासाने खेळत होते आणि त्यामुळे ब्लास्टर्स कुठेतरी बॅकफूटवर झालेले दिसले. 68व्या मिनिटाला एड्रीयन लुनाने गोलचा सुरेख प्रयत्न केला, परंतु मजुमदारने चतुराईने तो रोखला.

A stalemate at the Marina Arena.✊🏻#CFCKBFC #ഒന്നായിപോരാടാം #KBFC #KeralaBlasters pic.twitter.com/LsWASbXyBf

— Kerala Blasters FC (@KeralaBlasters) December 19, 2022

चेन्नईयनने 70व्या मिनिटाला स्टार खेळाडू अल खयातीला मैदानावर उतरवले अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील सर्वाधिक गोल अल खयातीच्या नावावर आहेत. 76व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा आणखी एक गोल मजुमदारने अडवला. अखेरच्या 10 मिनिटांत आघाडी घेण्याचा खेळ सुरू झाला आणि त्यात ब्लास्टर्स किंचितचे वरचढ दिसले. 83व्या मिनिटाला रहिम अलीने डेंजर एरियात लुनाला पाडले अन् ब्लास्टर्सल फ्री किक मिळाली. पण, हाही प्रयत्न अयशस्वी ठरला. 90+1 मिनिटाला अनिरुद्ध थापा चेंडू ब्लास्टर्सच्या पेनल्टी क्षेत्रात घेऊन शिरला होता, मात्र त्याला अंतिम दिशा देता आली नाही. हा सामना बरोबरीत सुटला अन् केरळा ब्लास्टर्सची या मैदानावरील विजय न मिळवण्याची मालिका कायम राहिली.

निकाल: चेन्नईयन एफसी 1 ( व्हीन्सी बरेट्टो 48 मि. ) बरोबरी वि. केरळा ब्लास्टर्स 1 ( सहल अब्दुल समद 23 मि.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लईच चोपलयं! फक्त 13 वर्षांच्या पोराने पाडला 38 षटकार अन् 30 चौकारांचा पाऊस
पराभव लागला जिव्हारी! वाढदिवशीच फ्रान्सचा स्ट्रायकर बेन्झेमाची‌ तडकाफडकी निवृत्ती


Next Post
Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup

मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली 'अशी' कामगिरी

Dennis-Compton

मागील 74 वर्षांपासून अबाधित आहे कसोटीमधील 'हा' महाविक्रम; वनडे, टी20 पेक्षाही जास्त रोमांचक झालेला सामना

Brazil Football Team

FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143