Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दृष्टिहीन क्रिकेटपटू आणि एनजीओच्या मुलांनी अनुभवला इंडियन सुपर लीगचा थरार

दृष्टिहीन क्रिकेटपटू आणि एनजीओच्या मुलांनी अनुभवला इंडियन सुपर लीगचा थरार

December 20, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Photo Courtesy: Twitter/ Indian Super League

Photo Courtesy: Twitter/ Indian Super League


इंडियन सुपर लीगमध्ये (Indian Super League) दोन वर्षांनंतर प्रेक्षक स्टेडियमवर परतले आणि आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्याला तुडूंब गर्दी पाहायला मिळाली. खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना प्रेक्षकांचा आवाज पुन्हा ऐकून एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि त्याचा मैदानावरील संघांच्या कामगिरीवर झालेला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय.

प्रेक्षक त्यांच्यासोबत त्यांची उत्कटता आणि भावना घेऊन येतात. त्यामुळे जेव्हा खेळाडू मैदानात उतरतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. मागील आठवड्याच्या शेवटी जेव्हा नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने गुवाहाटी येथे हिरो आयएसएलच्या सामन्यात चेन्नईन एफसीचा सामना केला, तेव्हाही प्रेक्षकांचे प्रेम पाहायला मिळाले. पण, या प्रेक्षकांमध्ये एक गट असा होता की जो इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियम वरील गर्दीमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडला समर्थन करायला पोहोचला होता. हा गट इतरांपेक्षा वेगळा होता. यामध्ये तीन दृष्टिहीन क्रिकेटपटू आणि Care U 365 NGO मधील मुलांचा समावेश होता. ते प्रथमच हिरो आयएसएलच्या सामन्यासाठी स्टेडियमवर आले होते आणि त्यांनी स्थानिक संघाला पाठिंबा देण्याचा जयघोष अनुभवला.

यामध्ये राज्याच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा राजदीप होता आणि तो म्हणाला की,” मी नॉर्थ ईस्ट युनायटेडला त्यांच्या स्थापनेपासून फॉलो करतोय. मी अनेक वर्षांपासून त्यांचा चाहता आहे. यावेळी त्यांची सुरुवात चांगली झालेली नाही, पण मी त्यांना फॉलो करत आहे आणि पाठिंबा देत आहे.”

राजदीप आणि त्याचे सहकारी क्रिकेटपटू हे बंगळुरू आणि चंदीगड येथे होणाऱ्या आगामी चॅम्पियनशिप स्पर्धेची तयारी करत आहेत. त्यांना फुटबॉलची आवड आहे आणि भारताचा कर्णधार सुनील छेत्री याला ते आदर्श मानतात. राजदीप म्हणाला, “आमच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून मी सुनील छेत्रीकडून खूप प्रेरणा घेतो. मैदानावरील त्याच्या कामगिरीमुळे खेळाबद्दल प्रेम निर्माण झाले आहे आणि त्याच्या प्रति असलेले प्रेम मला येथे घेऊन आले आहे.”

क्रिकेटपटूंपैकी एक अंशतः दृष्टिहीन आहे, तर इतर अन्य दोघे हे NGOचे प्रकल्प संचालक सुशील पोरेल यांच्या कथनातून खेळाचा आस्वाद लुटत होते. ”निकाल काही लागत असला तरी आम्ही नॉर्थ ईस्ट युनायटेड साठी चिअर करत राहणार आहोत. सामन्याच्या दिवशी, हे सर्व सकाळी लवकर उठलो आणि आम्ही कधी त्यांना स्टेडियममध्ये घेऊन जातो याची ते आतुरतेने वाट पाहत होते,” असे पोरेल म्हणाले. “खेळ संपला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यामुळे त्यांच्यात राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आशा निर्माण झाली. फुटबॉलमध्ये एक संघ जिंकतो आणि दुसरा हरतो, पण आम्ही त्यांना निराश होऊ दिले नाही,” असेही ते पुढे म्हणाले.

Care U 365 NGO मधील सुमारे ३० मुलं स्थानिक संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर आली होती. निकाल स्थानिक संघाच्या बाजूने लागला नसला तरी ही संध्याकाळ या मुलांसाठी संस्मरणीय ठरली. या मुलांनी पहिल्यांदा फ्लड लाइट्स खाली चमकत असलेल्या हिरव्यागार खेळपट्टीवर फुटबॉलचा खेळ पाहिला होता.

“एकूण अनुभव खूप चांगला होता. नॉर्थ ईस्ट युनायटेडने चेन्नईयिनविरुद्ध तीन गोल केले आणि हीच सकारात्मकता आम्ही सर्वांनी या सामन्यातून घेतली. मुले खूप आनंदी होती. अशा प्रकारची टूर्नामेंट लाईव्ह अनुभवण्याची ही पहिलीच वेळ होती. हा अनुभव त्यांना आश्चर्यकारक करणारा होता, ” असे Care U 365 NGO चे बोरठाकुर भृगु म्हणाले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला 100 टक्के बोली लागणार”; चाळीशीचा अमित मिश्रा अजूनही आशावादी
सूर्याची फलंदाजी पाहून विराटही झाला होता हैराण; म्हणाला, ‘तू काय व्हिडिओ गेम खेळतोय का?’


Next Post
Ajinkya-Rahane

रहाणेच्या शतकाने भारताच्या कसोटी फलंदाजी फळीला टाकले चिंतेत! रणजीत दाखवला कॅप्टन्सीचा दम

Shane-Warne

बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन

Cricket-Australia

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143