क्रिकेटविश्व आणि फिल्म इंडस्ट्रीचे एकमेकांशी फार जुने संबंध आहेत. बऱ्याचदा मोठमोठे अभिनेते किंवा अभिनेत्री क्रिकेटपटूंना चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्याचे दिसले आहे. तर प्रीति झिंटा, शाहरुख खान अशा कलाकारांनी क्रिकेट क्षेत्रात गुंतवणूकही केली आहे. नुकताच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधला आहे.
अमेझॉन प्राइमवर वाजपेयीने विलियम्सनची एक व्हर्च्युअल मुलाखत घेतली आहे. यादरम्यान त्याने न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूला बरेचसे मजेशीर प्रश्नही विचारले आहेत. विलियम्सननेही अतरंगी अंदाजात बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यादरम्यान त्याने आपल्या आवडत्या भारतीय वेब सिरीज (Favourite Indian Web Series) च्या नावाचा खुलासाही केला आहे.
वाजपेयीने विलियम्सनला पहिला प्रश्न हा विचारला की, न्यूझीलंड क्रिकेट संघाने नुकतेच काय यश मिळवले आहे? याचे उत्तर देताना विलियम्सन म्हणतो की, “नुकतेच माझ्या संघाने काही विश्वचषकाचे अंतिम सामने खेळले आहेत. आम्ही आयसीसीची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे, जी आमच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहणार आहे.” यानंतर विलियम्सनने त्याच्या काही संघसहकाऱ्यांना क्रिकेटव्यतिरिक्त इतर भूमिकेत कल्पना करून सांगितले. ज्यामध्ये त्याने ग्लेन फिलिप्सला गुप्तहेर म्हटले तर मिचेल सेंटरन ९-५ काम करू शकणारा व्यक्ती म्हणून संबोधले.
पुढे वाजपेयीने विलियम्सनला न्यूझीलंडच्या येत्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकांविषयी प्रश्न विचारले. बांगलादेशविरुद्ध तुमची रणनिती काय असेल? असे विचारले असता विलियम्सनने मी आताच यासंबंधी कसलाही खुलासा करू शकत नसल्याचे सांगितले.
the excitement has crossed the boundary after hearing this big news! 🏏 #NewBigINNINGSOnPrime #LiveCricketOnPrime@BajpayeeManoj #KaneWilliamson @BLACKCAPS @WHITE_FERNS pic.twitter.com/fASHUQVDWu
— prime video IN (@PrimeVideoIN) December 20, 2021
त्यानंतर शेवटी वाजपेयीने विलियम्सनला अमेझॉन प्राइमवरील त्याच्या आवडत्या भारतीय वेब सिरीजविषयी विचारले. यावर विलियम्सनने वाजपेयीची पायखेची करत गमतीशीर उत्तर दिले. ‘फॅमिली मॅन’ वेब सिरीजमध्ये नायकची भूमिका बजावणाऱ्या वाजपेयीला उत्तर देताना विलियम्सनने त्याची आवडती भारतीय वेब सिरीज ही मिर्झापूर असल्याचे सांगितले. “मी मिर्झापूर वेब सिरीजचे पहिले दोन्ही भाग पाहिले असून मी तिसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.” त्याचे हे उत्तर ऐकून बाजपाईने त्वरित त्याला बाय बाय म्हणत मुलाखत संपवली. या गमतीशीर मुलाखतीचा व्हिडिओ अमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.