शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) भारतीय क्रिकेट क्षेत्राला हादरवणारी घटना घडली. या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात झाला. या अपघातात रिषभ थोडक्यात बचावला. त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आले. यावेळी त्याला भेटण्यासाठी बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी रिषभ पंत याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि अनिल कपूर (Anil Kapur) शनिवारी (दि.31 डिसेंबर) डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटल येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी कार अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) याची भेट घेतली. दोघांनीही पंतच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. त्यांनी सांगितले की पंतच्या तब्यतीत सुधारणा होत आहे. त्यांनी पंतच्या आईचीही भेट घेतली. ते म्हणाले की पंत फायटर आहे. या दोघांनी बराच वेळ त्याच्याशी चर्चा केली. त्याला आपल्या विनोदांनी हसवले. त्याच्याशी बोलताना त्यांना वाटले की त्याची तब्यत आता चांगली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की ,” पंतचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळे आम्हाला त्याला भेटण्याची ईच्छा झाली. त्याला तंदरुस्त पाहून आम्हाला आनंद झाला. आमच्या आणि पूर्ण देशाच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहे आणि तो लवकरात लवकर मैदानावर पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.”
रिषभ पंत याच्या डोक्याचा आणि मणक्याचा स्कॅन झाला आहे आणि त्याचा रिपोर्ट सामान्य आहे. पंतचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्या डोक्याला आणि कंबरेला जबर दुखापत झाली आहे. रिषभ पंत दिल्ली पासून रुडकीला जात असताना त्याच्या कारला अपघात झाला. त्याची कार डिवायडरच्या रेलिंग आणि एका पोलला टक्कर मारत हवेत रस्ताच्या दुसऱ्या बाजूला पडली आणि त्यानंतर कारने पेट घेतला.
रिषभ पंत हा भारताच्या क्रिकेट संघाचा महत्वपूर्ण भाग आहे. त्याने भारताला अनेक सामने आपल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवीन वर्षात रोहित-राहुलवर प्रश्नांची सरबत्ती! बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये
भारताला 30 दिवसांत खेळायचेत तब्बल ‘इतके’ सामने, पहिल्या सामन्यात हार्दिक कॅप्टन