मुंबई: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात बिगर मानांकीत तमिळनाडूच्या विपाशा मेहेराने चौथ्या मानांकीत महाराष्ट्राच्या सान्या सिंगचा 6-4, 4-6, 7-6(5) असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत दुस-या मानांकीत आसामच्या उदित गोगोईने दिल्लीच्या निशांत दबसचा 6-1, 6-3 असा तर हरियाणाच्या तिस-या मानांकीत सुशांत दबसने दिल्लीच्या समर रैनाचा 6-4, 7-6(3) असा टायब्रेकरमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात तमिळनाडूच्या बिगर मानांकीत विपाशा मेहेराने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत सान्या सिंगचा 6-4, 4-6, 7-6(5) असा पराभव करतच उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्रच्या चौदाव्या मानांकीत सुदिप्ता सेंथिली कुमारने तेलंगणाच्या संजना सिरिमल्लाचा 6-4, 6-4 तर महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत प्रेरणा विचारेने उत्तर प्रदेशच्या बाराव्या मानांकीत वंशीका चौधरीचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात हरियाणाच्या सुशांत दबस व दिवेश गहलोत या जोडीने आसामच्या उदित गोगोई व छत्तीसगडच्या नरेश बडगुजर यांचा 6-4, 3-6, 10-7 असा तर आसामच्या उदयवीर सिंगने पश्चिम बंगालच्या धृव तंग्री साथीत छत्तीसगडच्या भुपेंद्र दहिया व क्रिशन हुडा यांचा 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या दुहेरी गटात हरियाणाच्या संदिप्ती रावने उत्तर प्रदेशच्या वंशीका चौधरीच्या साथीत तेलंगणाच्या संस्कृती दमेरा व अंध्र प्रदेशच्या लक्ष्मी वुतुकुरु यांचा 6-3, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या रिचा चौघुले व प्रेरणा विचारे या जोडीने तमिळनाडूच्या विपाशा मेहराच्या व महाराष्ट्राच्या हृदया शहा यांचा 4-6, 7-5, 12-10 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
एकेरी गट : उपांत्यपुर्व फेरी: 16वर्षाखालील मुले:
मोहीत बोंद्रे(16) (गुजरात)वि.वि नरेश बडगुजर(12)(छत्तीसगड)3-6, 6-1, 6-1
सुशांत दबस(3)(हरियाणा) वि.वि समर रैना(दिल्ली) 6-4, 7-6(3)
दिवेश गहलोत(4)(हरियाणा) वि.वि धृव तंग्री(7)(पंजाब) 3-6, 7-6(8), 6-2
उदित गोगोई (2) (आसाम)वि.वि निशांत दबस(दिल्ली) 6-1, 6-3
मुली-
विपाशा मेहेरा(तमिळनाडू) वि.वि सान्या सिंग(4) (महाराष्ट्र) 6-4, 4-6, 7-6(5)
संदिप्ती राव(13) (हरियाणा)वि.वि शरण्या गवारे(9) (महाराष्ट्र) 6-3, 6-1
सुदिप्ता सेंथिली कुमार (14)(महाराष्ट्र) वि.वि संजना सिरिमल्ला(तेलंगणा) 6-4, 6-4
प्रेरणा विचारे(2)(महाराष्ट्र) वि.वि वंशीका चौधरी(12) (उत्तर प्रदेश) 6-1, 6-0
दुहेरी गट-मुले- उपांत्य फेरी
सुशांत दबस(हरियाणा)/दिवेश गहलोत (हरियाणा) वि.वि उदित गोगोई(आसाम)/नरेश बडगुजर(छत्तीसगड) 6-4, 3-6, 10-7
उदयवीर सिंग(आसाम)/धृव तंग्री(पश्चिम बंगाल) वि.वि भुपेंद्र दहिया(छत्तीसगड)/ क्रिशन हुडा(छत्तीसगड) 6-4, 6-4
मुली-
संदिप्ती राव(हरियाणा)/वंशीका चौधरी(उत्तर प्रदेश) वि.वि संस्कृती दमेरा(तेलंगणा)/लक्ष्मी वुतुकुरु(अंध्र प्रदेश) 6-3, 6-2
रिचा चौघुले(महाराष्ट्र)/प्रेरणा विचारे(महाराष्ट्र) वि.वि विपाशा मेहरा(तमिळनाडू)/हृदया शहा (महाराष्ट्र) 4-6, 7-5, 12-10