fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता भर पावसात सुरु राहणार क्रिकेटचा सामना, भारतात सुरु आहे सर्वात हायटेक स्टेडियमचे काम

July 12, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतामध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यात आतापर्यंत पावसाने खूप वेळा अडथळा आणला आहे. खरं तर भारत देशात छत असलेले एकही स्टेडियम नाही. पाऊसही सुरु असताना सामनाही सुरु आहे, असं आजपर्यंत कधी पाहायला मिळालं नाही.

परंतु आता ही समस्या लवकरच निकालात निघणार आहे. कारण पंजाब क्रिकेट असोसिएशनचे चंदीगडमध्ये बनवत असलेले जगातील पहिले हायटेक स्टेडियम लवकरच सेवेत दाखल होणार आहे. जगातील कोणत्याच स्टेडियममध्ये नाहीत अशा सुविधा येथे असणार आहेत.

मोटेरा या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्येसुद्धा पावसात सामना घेण्याच्या सुविधा नाहीत, ज्या येथे असणार आहेत.

या स्टेडियमचे नाव मुल्लाणपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे असून यासाठी १५० कोटी खर्च अपेक्षित आहे. हे स्टेड़ियम येथील आय़एल बिंद्रा स्टेडियमच्या तीनपट मोठे आहे. या स्टेडियमचे आकारमान हे ८ लाख स्केअर फूट एवढे आहे.

हे स्टेडियम जगातील इतर हायटेक स्टेडियमपेक्षा थोडे वेगळे आहे आणि कोणत्याही परिस्थितीतही येथे सामने खेळवता येतील.

भविष्यातील गरज लक्षात घेऊन तयार केलेले हे क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेले क्रिकेट स्टेडियम आहे. येथे सौर यंत्रणेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे पाण्याची बचत होणार असून तेच परत वापरात आणले जाणार आहे.

हिरवळीसाठी काही खास वृक्ष लागवड केली जाणार आहे. स्टेडियममध्ये विशेष ड्रेनेज सिस्टम बसविण्यात आली आहे. कितीही पाऊस पडला तरी सामन्यात अडथळा होणार नाही. उन्हाचा आणि पावसाचा प्रेक्षांकना त्रास होऊ नये म्हणून पारदर्शी छत लावण्यात येणार आहे.

मार्च २०२१ पर्यंत बांधकाम होईल पूर्ण
पंजाब क्रिकेट असोसिएशनतर्फे उभारण्यात येणाऱ्या या स्टेडियमचे काम जवळजवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. या स्टेडियमचे बांधकाम ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते, परंतु लॉकडाऊनमुळे काम पुर्ण होऊ शकले नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा म्हणाले की, मार्च २०२१ पर्यंत आम्ही सर्व बांधकाम पूर्ण करू. जर हे स्टेडियम मार्चपर्यंत तयार झाले तर पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे काही सामनेही येथे आयोजित केले जाऊ शकतात.

स्टेडियममध्ये ३० कॉर्पोरेट बॉक्स
या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुविधांचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यात ३० कॉर्पोरेट बॉक्स आहेत, जसे अद्याप भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये नाहीत.
प्रत्येक कॉर्पोरेट बॉक्समध्ये ६० जागा असतील. कॉर्पोरेट लोक १० ते २० वर्षे स्वत: साठी बुक करू शकतात. तसेच या स्टेडियममध्ये ३६ हजार प्रेक्षक एकत्र बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

भविष्यात आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय खेळपट्टीचे क्यूरेटर दलजित सिंग म्हणतात की हे देशातील असे एकमेव क्रिकेट स्टेडियम आहे, कि ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सात खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक खेळपट्टीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने खेळवता येतील. या हंगामात या स्टेडियममध्ये रणजी सामने खेळवले जातील अशी अपेक्षा होती, पण कोरोना साथीच्या महामारीमुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेबद्दल परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

भविष्यात या स्टेडियममध्ये आयपीएल व आंतरराष्ट्रीय स्तररावरील सर्व सामने होऊ शकतात. कारण पार्किंग आणि ट्राफिक संबंधित कोणतीही अडचण होणार नाही. येथे एकाच वेळी १६४० गाड्या पार्क करता येतील.


Previous Post

सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार ‘या’ संघाकडून

Next Post

जोफ्रा आर्चरच्या खतरनाक चेंडूवर हा फलंदाज झाला घायाळ; तुटला अंगठा?

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

जोफ्रा आर्चरच्या खतरनाक चेंडूवर हा फलंदाज झाला घायाळ; तुटला अंगठा?

पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडवर वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय

इंग्लंडला पहिल्या कसोटीत पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचे विराट कोहलीने असे केले कौतुक

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.