fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीला स्थान न मिळालेल्या या संघात दोन भारतीयांचा समावेश

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने शुक्रवारी (३ एप्रिल) आपल्या सर्वकालीन अकरा जणांच्या कसोटी संघाची निवड केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या आवडत्या खेळाडूंचा उल्लेख केला आहे आणि त्या खेळाडूंचे वर्णन आतापर्यंतचे सर्वात चांगले खेळाडू म्हणून केले आहे.

हॉगने आपल्या संघात वेस्ट इंडीज संघाचे ४, पाकिस्तान, इंग्लंड आणि भारताच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश केला आहे.

खरं तर एका चाहत्याने हॉगला ट्विटरवरून प्रश्न विचारला होता की तुमची सर्वकालीन कसोटी संघात कोण कोण असेल? तुम्ही यामध्ये माजी खेळाडूंचाही समावेश करू शकता. याच प्रश्नाचं उत्तर देत हॉगने आपला सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. विशेष म्हणजे हॉगने या संघात भारतीय संघाच्या दोन खेळाडूंमध्ये एमएस धोनीला संधी दिलेली नाही.

हॉगने आपल्या संघात सलामीवीर म्हणून जावेद मियाँदाद (Javed Miandad) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांची निवड केली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांना स्थान देण्यात आले आहे.

या अकरा जणांच्या कसोटी संघात (All Time  Playing XI Test) चौथ्या क्रमांकावर ब्रायन लारा (Brian Lara) आणि पाचव्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) स्थान दिले आहे.

तसेच संघातील मधल्या फळीतील खेळाडू म्हणून डेव्हिड गॉवर (David Gower) आणि जेक रसेल (Jack Russell) यांचा समावेश केला आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजांमध्ये इमरान खान (Imran Khan), जोएल गार्नर (Joel Garner), मालकॉम मार्शल (Malcom Marshell) आणि शेन वॉर्नचा (Shane Warne) समावेश आहे.

याबरोबरच हॉगने ट्वीटमध्ये लिहिले की, जर ते अजून मागे जाऊ शकले तर त्यांना ग्रीनिज (Greenidge) आणि हेनेस (Haynes) हे खेळाडूदेखील आवडत होते.

सध्या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) सर्व क्रीडास्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही मालिका सुरु नाही. अशामध्ये हॉग ट्विटरवर आपला वेळ घालवत आहेत. त्यांना ट्विटर अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. तसेच ते या प्रश्नांची उत्तरेही देत आहेत.

असा आहे हॉगचा ११ जणांचा सर्वकालीन कसोटी संघ-

जावेद मियाँदाद, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विवियन रिचर्ड्स, डेव्हिड गॉवर, जॅक रसेल, इमरान खान, जोएल गार्नर, मालकॉम मार्शल, शेन वॉर्न.

ट्रेंडिंग घडामोडी – 

आणि एमएस धोनी पुन्हा झाला कर्णधार

वैतागलेला चहल म्हणतो, मुंबई इंडियन्स, तुम्ही स्वप्न पाहत बसा

व्हिडीओ: आता केदार जाधवही म्हणतोय, गो कोरोना

You might also like