2019ला होणाऱ्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅड हॉजला प्रशिक्षकपद सोडण्यासाठी सांगण्यात आले आहे.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज हॉजला पंजाब संघाने 2018 च्या आयपीएल मोसमावेळी प्रशिक्षकपदासाठी तीन वर्षांचा करार केला होता. परंतू एक वर्षांनंतरच त्याला प्रशिक्षकपद सोडण्यासाठी विचारण्यात आले आहे.
हॉजच्या मार्गदर्शनाखाली पंजाबने जबरदस्त सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या सातपैकी पाच सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या दोन संघात स्थान मिळवले होते.
परंतू त्यानंतर मिळालेल्या एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर पंजाबला 7 पैकी फक्त 1 च सामना जिंकता आला.त्यामुळे ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर फेकले गेले.
हॉजने याआधी आयपीएलमध्ये 2016 आणि 2017 मध्ये गुजरात लायन्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. यावेळी गुजरातने 2016ला प्लेआॅफमध्ये स्थान मिळवले होते. तर 2017ला 7 व्या स्थानी गुजरातला समाधान मानावे लागले होते.
तसेच सध्या सुरु असलेल्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये हॉज सेन्ट लुसीया स्टार संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे.
मात्र पंजाबचे मार्गदर्शक असणाऱ्या विरेंद्र सेहवागच्या बाबतीत कोणतेही वृत्त नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच दोन कांस्यपदके
–आयपीएलमध्ये या दोन संघांसाठी असतील दोन आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक
–केराॅन पोलार्डचा टी२०मध्ये धमाका, एकाच षटकात केल्या ३० धावा