fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी, पॉइंट्स टेबलमध्ये या क्रमांकावर असणार मुंबई इंडियन्स

Brad Hogg told which place of points table Mumbai Indians Will Stay

September 2, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलमध्ये अनेक संघानी विजेतेपद पटकाविले आहे. परंतु आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद पटकाविणारा यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकाविले आहे. आता आयपीएल २०२० चे आयोजन यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून होत आहे. या आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

मुंबई इंडियन्स क्रमवारीत असणार अव्वल

यूट्यूब चॅनेलशी बोलताना हॉगने मुंबई इंडियन्सच्या क्रमवारीबद्दल भविष्यवाणी करत म्हटले, “नेहमीप्रमाणे यावर्षीही मुंबई इंडियन्स संघ क्रमवारीत सर्वात वर असेल. परंतु ते आयपीएलचा अंतिम सामना जिंकतील का?, हे पाहावे लागेल.”

मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२०चेही विजेतेपद पटकावू शकते. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्याकडे फॉर्ममध्ये असलेला फलंदाज रोहित शर्मा आहे तसेच त्यांच्याकडे ख्रिस लिन आणि क्विंटन डी कॉक सारखे फलंदाजही आहेत. या फलंदाजांमध्ये एकट्याच्या जोरावर संघाला सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.

मुंबई इंडियन्सकडे कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्यासारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडूही आहेत, तर गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे घातक गोलंदाजही आहेत.

४ परदेशी खेळाडू

हॉगने मुंबई इंडियन्सबद्दल बोलताना पुढे म्हटले, “मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चिंता असेल, ती त्यांच्या टॉप४च्या निवडीची. मुंबईकडे अनेक शानदार अष्टपैलू, फिरकीपटू आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी यावर्षी एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी आक्रमणही ठेवले आहे. असे असले तरी, संघात सर्वात मोठी कमतरता आहे, ती म्हणजे ते ४ परदेशी खेळाडूंचा वापर कशाप्रकारे करतात. जेणेकरून त्यांना एक परफेक्ट प्लेइंग इलेव्हन मिळेल.”

सूर्यकुमार यादव असणार टॉप ५ फलंदाजांमध्ये सामील

हॉगने मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे. तो म्हणाला, “सूर्यकुमारने मागील काही वर्षांमध्ये स्वत:मध्ये सुधारणा केल्या आहेत. आणि यावेळी तो मंबई इंडियन्स संघासाठी हुकमी इक्का सिद्ध होऊ शकतो. तो यावेळी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत सामील होईल.”

महत्त्वाच्या बातम्या-

-क्वारंटाईनमध्ये असलेल्या दीपक चाहरने शेअर केला व्हिडिओ म्हणाला, मी आता…

-अखेर संकटांनी वेढलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी आली आनंदाची बातमी

-हा भारतीय क्रिकेटर म्हणतोय, त्याच्यात आहे भविष्यवाणी करण्याची क्षमता

ट्रेंडिंग लेख-

-जर ही गोष्ट घडली नसती तर अँडरसनच्या आधीच ‘या’ ३ वेगवान गोलंदाजांनी घेतल्या असत्या कसोटीत ६०० विकेट्स

-४ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये ठोकलेत केवळ ४ शतके, पहा कोणत्या फलंदाजांनी केलाय हा पराक्रम

-रंगअंधत्व असतानाही मोठी कारकिर्द घडवणाऱ्या ख्रिस राॅजर्सबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?


Previous Post

क्वारंटाईनमध्ये असलेल्या दीपक चाहरने शेअर केला व्हिडिओ म्हणाला, मी आता…

Next Post

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.