कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत सोमवारी (28 नोव्हेंबर) ग्रुप जी मध्ये ब्राझिल विरुद्ध स्वित्झर्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्वित्झर्लंड 1-0 असा पराभूत झाला आणि ब्राझिलने अंतिम 16मध्ये धडक मारली. हा एकमेव गोल कॅसमीरो याने केला. ब्राझिलच्या आधी फ्रांसनेही अंतिम अकरामध्ये प्रवेश केला आहे.
फिफाच्या क्रमवारीत ब्राझिल पहिल्या स्थानावर तर स्वित्झर्लंड 15व्या स्थानावर आहे. यामुळे हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता होती आणि झालेही तसेच, सामन्यात एकच गोल झाला. या पराभवामुळे स्वित्झर्लंडला पुढची फेरी गाठण्यास सर्बियाला पराभूत करावे लागेल. दुसरीकडे पाच वेळेचा चॅम्पियन संघ ब्राझिलचा पुढील सामना कॅमेरूनशी आहे. जो त्यांच्यासाठी सराव सामन्यासारखाच असणार आहे. ब्राझिलने दोन सामन्यात दोन विजय मिळवत 6 गुण कमावले.
या सामन्याच्या पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. मात्र ब्राझिलने आक्रमक खेळ केला आणि सहा वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील दोन गोल नेटमध्ये जाणारच होते, पण गोलकिपर यान सोमर याने उत्तम बचाव केला. दुसरीकडे स्वित्झर्लंडने देखील एक गोल करण्याची संधी होती, पण तो बॉल नेटमध्ये गेला नाही. तसेच पहिल्या 45 मिनिटांमध्ये बॉलवर ब्राझिलचेच वर्चस्व राहिले.
दुसऱ्या सत्राच्या 64व्या मिनिटालाच विनीसियस ज्युनियर सामने गोल केला, मात्र तो व्हिडिओ असिस्टंट रेफरीने (VAR) बाद केला. यामुळे सामना पुन्हा एकदा 0-0 राहिला. शेवटी 83व्या मिनिटाला कॅसमिरो याने गोल केला. या गोलसाठी त्याला असिस्ट सबस्टिट्यूट रोड्रिगो (Rodrygo) याने केला. सामन्यात ब्राझिलने 1-0 अशी आघाडी घेतली. जी शेवटपर्यंत कायम राहिली आणि त्यांनी सामना जिंकला.
???? Brazil have booked their ticket to the Round of 16@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 28, 2022
या विजयाबरोबरच ब्राझिलने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो म्हणजे ते 1998पासून विश्वचषकाच्या साखळी सामन्यात एकदाही पराभूत झाले नाही. यामुळे ते आता सलग 17 सामन्यात अपराजित आहेत. स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर दुखापतीमुळे किमान दोन सामने तरी बाहेर आहे. त्याचबरोबर पोर्तुगलही या विश्वचषकाच्या अंतिम 16मध्ये पोहोचला आहे. Brazil beat Switzerland thanks to Casemiro’s goal & enter in last 16 FIFA World Cup 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय! तब्बल 11 देशात कसोटी शतक करणारा पहिला क्रिकेटर
‘मला नोकरासारखी वागणूक द्यायचे…’, वसीम अक्रमकडून दिग्गजावर मोठे आरोप