भारतीय क्रिकेटमध्ये आपण अनेक प्रतिभाशाली खेळाडू बघितले आहे, युवा खेळाडूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. आयपीएल ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी पेक्षा कमी नाही. आयपीएलने अनेक खेळाडूंचे आयुष्य बदलले आहे. अनेक खेळाडूंनी आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात जागा मिळवण्यात यश मिळवले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचे (केकेआर) प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचा असा विश्वास आहे, की भारताचा नवोदित युवा फलंदाज शुभमन गिल लवकरच आयपीएल (आयपीएल)मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ते म्हणतात की गिल एक तेजस्वी क्रिकेटपटू आहे आणि एकाच वेळी दोन्ही संघांचा कार्यभार तो स्वीकारेल. क्रिकबझशी झालेल्या संभाषणात मॅक्युलम यांनी गिलच्या नेतृत्वाच्या संभाव्यतेविषयी विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएलच्या १४ व्या मोसमात गिलने ७ सामन्यांत १८. ८५ च्या सरासरीने १३२ धावा केल्या. ते म्हणाले की केकेआरसाठी स्फोटक टी20 खेळाडू म्हणून शुभमन गिल तयार होत आहे. मॅक्युलम म्हणाले की गिल सुपरस्टार होणार आहे आणि विश्वास आहे की ते त्याच्या खेळात त्याला मदत करू शकतील.
गिल भारताच्या सर्वोत्तम टी२० खेळाडूंपैकी एक असेल
आपल्या काळातील स्फोटक फलंदाज म्हणून ओळख मिळवणारा न्यूझीलंडचा मॅक्युलम म्हणाला की “मी गिलला बॉल स्ट्राइकिंगबद्दल शिकवू शकत नाही. तो माझ्यापेक्षा चांगले फटकेबाजी करतो.” ते म्हणाले की,” मला वाटते की पुढच्या दोन वर्षांत आपण गिलला भारतातील एक टी२० मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पाहू शकतो.”
सध्या, शुभमन गिल भारतीय संघ समवेत इंग्लंडच्या दौर्यावर आहेत. न्यूझीलंड विरुद्ध १८ जून ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. शुभमन गिल ऐतिहासिक फायनलचा भाग बनतो की नाही हे पाहणे उत्सुकाचे ठरेल. या
शुभमन गिलने भारतासाठी आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहे त्यात त्याने ३७८ धावा केल्या आहे, त्यात त्याने ३ अर्धशतक मारले आहे.
महत्वाच्या बातम्या
आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
रॉस टेलर ३७व्या वर्षीही पाडतोय धावांचा पाऊस, ‘या’ विक्रमात टाकले कोहलीला मागे
कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? ‘या’ व्हिडिओतून मिळाले संकेत