सध्या बांगलादेशचा संघ झिम्बाब्वे दौर्यावर आहे. एकमेव कसोटीत विजय मिळवल्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत देखील पाहुणे १-० अशा आघाडीवर आहेत. त्याचवेळी वनडे मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरु असून, यजमान झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करत आहे. या डावात झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
झिम्बाब्वेची खराब सुरुवात
हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे दोन्ही सलामीवीर ३३ धावांवर माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू व कर्णधार ब्रेंडन टेलर फलंदाजीसाठी आला. त्याने आधी चकब्वा व त्यानंतर मायर्ससोबत संघाचा डाव सावरला व संघाला २४ षटकात १११ धावांपर्यंत मजल मारून दिली.
टेलरने मारून घेतली स्वतःच्या पायावर कुऱ्हाड
झिम्बाब्वेच्या डावातील २५ वे षटक बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लाम टाकत होता. त्याने षटकातील दुसरा चेंडू बाउन्सर पद्धतीचा टाकला. टेलरने हा चेंडू सोडला. मात्र, त्यानंतर तो पुढे येत असताना त्याची बॅट मागे स्टंपवर जाऊन आदळली. अशाप्रकारे तो वैयक्तिक ४६ धावांवर हिटविकेट पद्धतीने बाद झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Santokie89/status/1416690596111077376
Brendan Taylor out with one of the most ridiculous wickets I've seen in a long time ???? #ZIMvBAN https://t.co/lBzpmozdfD
HALF TIME #INDvSL #INDvsSL #Israel— Human Being (@skalamz) July 18, 2021
झिम्बाब्वेची सन्मानजनक धावसंख्या
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर झिम्बाब्वे संघाने दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्या उभारली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला अष्टपैलू वेस्ले मेधवेरे याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्णधार टेलरने ४५ तर, अनुभवी सिकंदर रझाने ३० धावांचे योगदान दिले. निर्धारित ५० षटकात त्यांनी ९ बाद २४० धावा धावफलकावर लावल्या. बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लामने सर्वाधिक ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत खेळतोय आपल्या त्रिमूर्तीविना; तब्बल सहा वर्षानंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडलीये ‘ही’ गोष्ट
संजू सॅमसनच्या पदार्पणाची चर्चा असूनही इशान किशनला का मिळाली संधी? कारण आले पुढे
लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्म्रीती मंधना