प्रेक्षक इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. आज रात्री 7.30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान अबू धाबी येथे पहिला सामना आज खेळला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या या हंगामातून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघ कशी कामगिरी करतो हे पाहावं लागेल. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली याने स्टार स्पोर्ट्स च्या एका कार्यक्रमात बोलतांना मुंबई इंडियन्समधील एका गोलंदाजाचे नाव सांगितले आहे जो लसिथ मलिंगाची कमतरता पूर्ण करू शकतो.
तो म्हणाला, “आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करतो. तो श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा याची कमतरता पूर्ण करू शकतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “जेव्हापासून बुमराहने भारतीय संघात खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मी त्याची प्रशंसा करत आहे. त्याची गोलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. ज्यामुळे फलंदाजांसाठी चेंडू आत येतो. तो दोन्ही बाजूला चेंडू फिरवू शकतो आणि नवीन चेंडूने तो चांगली गोलंदाजी करतो. जुन्या चेंडूने गोलंदाजी करतांना मला तो अधिक चांगला वाटतो ज्यामुळे तो मलिंगाची जागा भरु शकेल आणि शेवटच्या षटकांत चांगली गोलंदाजी करू शकेल.”
बुमराहच्या क्षमतेबद्दल बोलतांना ब्रेट ली म्हणाला “बुमराह ताशी 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो आणि सतत यॉर्कर्स टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. हे फारच कमी गोलंदाज करू शकतात.”
मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलतांना तो म्हणाला, “मुंबई इंडियन्स मागील हंगामातील विजयी संघ आहे. हा एक मजबूत संघ आहे.स्टार फलंदाज कायरान पोलार्डही उत्तम फलंदाजी करत आहे. कर्णधार रोहित शर्मा काय करू शकतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबई संघात बुमराह, मोठे फटके खेळणारे खेळाडू आणि बरेच चांगले फिरकीपटू आहेत. स्पर्धेच्या शेवटी मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या चार संघामध्ये असेल.”
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलतांना तो म्हणाला, “चेन्नई संघ गुणतालिकेत शीर्ष स्थानी असणाऱ्या 4 संघांच्या यादीत स्थान मिळविण्याचा प्रबळ दावेदार आहे. उत्कृष्ट फिरकीपटू त्यांच्या संघात आहेत. युएईची परिस्थिती मिशेल सॅन्टनर आणि रवींद्र जडेजा यांच्यासाठी अनुकूल आहे. त्यांना याचा फायदा घेता येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली तलवार भेट
‘हा’ कर्णधार म्हणतोय, माझ्या संघामधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कोणीही निराश नाही
ट्रेंडिंग लेख –
“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन