जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. आज (१२ एप्रिल) हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आयपीएलमधील एक मोठा विक्रम तोडण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे.
मी हा विक्रम तोडू इच्छितो
राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू आणि सलामीवीर जोस बटलरने पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एका क्रिकेट संकेतस्थळावर आगामी आयपीएलविषयी चर्चा केली. यामध्ये त्याने म्हटले की, “मला आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम तोडायचा आहे.”
आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम व्हिडिओ ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने २०१२ आयपीएलवेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध १७५ धावांची खेळी करताना तब्बल १७ षटकार ठोकले होते.
बटलरमध्ये आहे ही क्षमता
इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या बटलरमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. बटलर सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्यास तो अशी कामगिरी करू शकतो. बटलरने आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक ७ षटकार मारले आहेत. ७ ते १८ असा प्रवास त्याच्यासाठी सोपा नसेल, मात्र त्याच्यासारख्या खेळाडूला डावलता येणार नाही.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानी ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात १३ षटकार ठोकले होते.
अशी राहिली आहे बटलरची आयपीएल कारकीर्द
यष्टीरक्षक फलंदाज या नात्याने खेळणारा जोस बटलर आयपीएलमध्ये २०१६ हंगामापासुन खेळत आहे. पहिले दोन हंगाम तो मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. २०१८ आयपीएलवेळी राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तेव्हापासून त्याने राजस्थानसाठी अनेक संस्मरणीय खेळ्या केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ५८ सामने खेळताना १७१४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ३५ तर स्ट्राईक रेट १४९ असा राहिला आहे.
महत्त्वात्या बातम्या –
केन विलियम्सनला KKR विरुद्ध का दिली नाही संधी? संघ प्रशिक्षकाने सांगितले कारण
पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजाला बाद करणारा भारतीय गोलंदाज पाहतोय पुनरागमनाची वाट, म्हणाला…