Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जरा इकडे पाहा! प्रत्येक विमानतळावर सूर्यकुमार कसा काढतो फोटो? रोहितने नक्कलच करून दाखवली

October 20, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-And-Suryakumar-Yadav

Photo Courtesy: Instagram/mumbaiindians


भारतीय क्रिकेटपटू जेवढे त्यांच्या खेळासाठी ओळखले जातात, तेवढेच ते त्यांच्या मजेशीर स्वभावामुळेही चर्चेत असतात. कधी ते  संघसहकाऱ्यांसोबतचे, तर कधी आपल्या मुलांसोबतचे व्हिडिओही शेअर करत असतात. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचाही समावेश आहे. रोहित संघसहकाऱ्यांची नक्कलही करत असतो. अशातच रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तो फलंदाज सूर्यकुमार यादव याची खिल्ली उडवताना दिसत आहे. यादरम्यान भारतीय संघाचे अनेक खेळाडूही उपस्थित होते.

रोहितने केली सूर्यकुमारची नक्कल
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) संघासमोर म्हणत आहे की, “मी आता त्या खेळाडूंना फोन पास करत आहे, ज्याच्याकडे प्रत्येक विमानतळावरील आपला फोटो आहे.” यानंतर तो सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची खिल्ली उडवत त्याची नक्ल करतो. तो त्याचप्रकारे पोझ देतो, ज्याप्रकारे सूर्यकुमार फोटो काढताना देत असतो. हेही खरे आहे की, सूर्यकुमार अनेकदा विमानतळावर फोटो क्लिक करतो आणि सोशल मीडियावरही शेअर करतो.

सूर्यकुमारलाही फुटले हसू
रोहित जेव्हा सूर्यकुमार यादवची नक्कल करत होता, तेव्हा सोबत उभे असणारे खेळाडूही हसताना दिसले. यावेळी सूर्यकुमारने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तोदेखील जोरजोरात हसू लागला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “कॅमेरा दिसला, तर फोटो तर काढलाच पाहिजे ना.” यामध्ये एका इमोजीचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये हाताचा अंगठा दिसत आहे. सूर्यादेखील याच अंदाजात फोटो क्लिक करत असतो. व्हिडिओत दिसते की, युझवेंद्र चहल, आर अश्विनसोबत इतर खेळाडूही या क्षणाचा आनंद लुटत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

टी20 विश्वचषकात पहिला सामना पाकिस्तानशी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे लक्ष टी20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीवर आहे. या राऊंडमध्ये संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना मेलबर्न येथे 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘स्पिनर आणि पेसर्सही त्याचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत’, माजी भारतीयाचा सूर्यावर पूर्ण विश्वास
‘भारताला कुणाचीही ऐकण्याची गरज नाही’, क्रीडा मंत्र्यांचे पाकिस्तानच्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर


Next Post
Ruturaj Gaikwad and MS Dhoni

पुणेकर ऋतुराज धोनीकडून शिकला विकेटकीपिंग! शानदार स्टंपिंग करत सॅमसनला दाखवला तंबूचा रस्ता

Wasim-Akram

'बाकीचे खेळाडू काय छोले विकायला गेले होते का?', विश्वचषकाच्या प्रश्नावर भडकला पाकिस्तानी दिग्गज

Photo Courtesy: Twitter

T20WC: सचिनने उलगडले ऑस्ट्रेलियाच्या मैदानांचे 'रहस्य'! ज्याने घेतले मनावर तोच होणार विनर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143