क्रिकेट आणि बॉलिवूड हे नातं काही भारतीयांसाठी नवीन नाही. आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. यातील सध्या नेहमीच चर्चेत होणारे जोडपे म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. सध्याच्या सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी जोडप्यांमध्ये विराट-अनुष्काचे नाव घेतले जाते.
बरोबर चार वर्षांपूर्वी 11 डिसेंबर 2017 ला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह झाला होता. त्यांचा विवाह झाल्यानंतर या दोघांनी सोशल मीडियाचा आधार घेत त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांपर्यंत पोहचवली होती.
Today we have promised each other to be bound in love for ever. We are truly blessed to share the news with you.This beautiful day will be made more special with the love and support of our family of fans & well wishers. Thank you for being such an important part of our journey. pic.twitter.com/aobTUwMNAK
— Virat Kohli (@imVkohli) December 11, 2017
त्यांच्या लग्नासाठी त्यांचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. इटलीमध्ये थाटामाटात पार पडलेल्या विराट- अनुष्काच्या या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Today we have promised each other to be bound in love forever. We are truly blessed to share the news with you. This beautiful day will be made more special with the love and support of our family of fans & well wishers. Thank you for being such an important part of our journey. pic.twitter.com/Scobdiqk7l
— Anushka Sharma (@AnushkaSharma) December 11, 2017
विराट आणि अनुष्का यांना आता एक वर्षाची मुलगी देखील आहे. तिचे नाव वामिका आहे. त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त विराट आणि अनुष्का या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
विराटने अनुष्का आणि वामिकाबरोबरचा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘४ वर्षे माझे वाईट जोक आणि आळशीपणा सांभाळण्यासाठी. ४ वर्षे मी जसा आहे, तसा मला स्वीकारण्यासाठी आणि ते त्रासदायक असले तरी माझ्यावर प्रेम करण्यासाठी. ४ वर्षांत ईश्वराने आपल्याला आशिर्वाद दिला आहे. सर्वात प्रामाणिक, प्रेमळ, धाडसी स्त्रीबरोबर ४ वर्षांपूर्वी लग्न झाले, जिने संपूर्ण जग जरी विरोधात असतानाही मला योग्य गोष्टीसाठी उभे राहण्यासाठी प्रेरित केले. तुझ्याबरोबर लग्न होऊन ४ वर्षे झाली. तू मला प्रत्येक गोष्टीत पूर्ण करतेस. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहिल. हा दिवस अजूनच खास आहे, कारण यावेळी लग्नाच्या वाढदिवसाला आपले कुटुंब आहे आणि या आपल्या मुलीमुळे आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखे वाटते.’
https://www.instagram.com/p/CXVsDPotqA4/
अनुष्काने देखील दोघांचे गोड फोटो शेअर करत लिहिले, ‘बाहेर पडण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही, घरासाठी शॉर्टकट नाही, हे तुझे आवडते गाणे आणि शब्द. याचप्रमाणे तू जगतो. हे शब्द नात्यांसाठी तसेच प्रत्येक गोष्टीसाठी खरे आहेत. विविध समज आणि दृष्टीकोनांनी भरलेल्या जगात तुझ्यासारखा व्यक्ती होण्यासाठी प्रचंड धैर्य लागते. मला जेव्हा गरज लागेल, तेव्हा प्रेरणा देण्यासाठी आणि तुला जेव्हा ऐकून घ्यावे असे वाटत असताना मन मोकळं करण्यासाठी धन्यवाद. लग्न हे तेव्हाच यशस्वी होतं, जेव्हा दोघांना सुरक्षित वाटतं, आणि मला माहित असलेला तू सर्वात सुरक्षित व्यक्ती आहेस. मी यापूर्वीही सांगितले आहे, की जे तुला खरंच ओळखतात, ते सुदैवी आहेत. आशा आहे की प्रेम, प्रामाणिकता, पारदर्शकता आणि आदर आपल्यात नेहमी राहावा.’
https://www.instagram.com/p/CXVnyF-MESj/
असे पार पडले विराट अनुष्काचे लग्न –
There are few who are so lucky to tie the knot with someone they love & you are one of them. As your fandom representatives, we wish these pleasures will last forevermore. Wishing a very Happy Married Life to the couple we adore! 💑 @imVkohli @AnushkaSharma #VirushkaWEDDING pic.twitter.com/4xfHwQm7I2
— ViratGang (@ViratGang) December 11, 2017
Congrats @imVkohli and @AnushkaSharma ! Can't take my eyes off from these wedding pics, all the best!!! 😍😇 pic.twitter.com/NkZqbCUWrv
— Dileep (@Viratholic) December 12, 2017
[VIDEO] When @imVkohli welcomed @AnushkaSharma at the wedding dais. :') (Video Courtesy: @gagangujrals) #VirushkaWEDDING #VGVK18FC pic.twitter.com/elFeClxViF
— ViratGang (@ViratGang) December 11, 2017
#VirushkaWEDDING ring exchange ceremony.
The most memorable moment for the couple #AnushkaSharma and #ViratKohli.#ViratWedsAnushka pic.twitter.com/j3XsfGKTHa
— Surendhar MK (@SurendharMK) December 11, 2017
Click of #Virat kohli and #Anuskha from Mehendi function with his family. 😍 #ViruskhaWEDDING pic.twitter.com/sI0xwliA1q
— Virat Kohli fan Club (@Virat_Official) December 11, 2017
[VIDEO] A look at @imVkohli's Haldi ceremony. ❤ @AnushkaSharma #VirushkaWEDDING #VGVK18FC pic.twitter.com/pxQKYPzI96
— ViratGang (@ViratGang) December 11, 2017
[PICS] [EXCLUSIVE] @imVkohli enjoying & posing with his friends & family. 😋 #VirushkaWEDDING #VGVK18FC pic.twitter.com/jz6ArNkfpk
— ViratGang (@ViratGang) December 11, 2017
[VIDEO] The moment to cherish forever for @imVkohli & @AnushkaSharma! 💞(Video Courtesy: @gagangujrals) #VirushkaWEDDING #VGVK18FC pic.twitter.com/3A8M0HAmRN
— ViratGang (@ViratGang) December 11, 2017
विराट आणि अनुष्का लग्नाच्या आधी काहीवर्षांपूर्वी एका जाहिरातीच्या शूटदरम्यान भेटले होते. त्यानंतर त्यांनी काहीवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
महत्त्वाच्या बातम्या –
Photo: जसा बाप, तसा मुलगा…! आपल्यापासून दूर असलेल्या मुलाशी धवनचा व्हिडिओ कॉलद्वारे प्रेमळ संवाद
धक्कादायक! सरावानंतर २७ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अहमदनगरमधील घटना