पुणे । अमित जगताप मित्र परिवार आयोजित चॅम्पियन्स करंडक टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत सीबीएसएल, सिमन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवड येथील टेल्को मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत सीबीएसएल संघाने कॉग्निझंट संघावर पाच गडी राखून मात केली. सीबीएसएलच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून कॉग्निझंटला १९.५ षटकांत ९८ धावांत रोखले. कॉग्निझंटकडून नितेश सप्रेने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. सीबीएसएलने विजयी लक्ष्य १६.५ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
यानंतर नेहरू स्टेडियमवर झालेल्या दुस-या लढतीत सिमन्स संघाने माइंडट्री संघावर ४५ धावांनी मात केली. यात हिमांशू अगरवालच्या नाबाद शतकाच्या जोरावर सिमन्स संघाने २ बाद २०२ धावा केल्या. हिमांशूने ६४ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांसह नाबाद ११५ धावा केल्या, तर नमन शर्माने ५२ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ६१ धावा केल्या. हिमांशू-नमन जोडीने तिस-या गड्यासाठी नाबाद १५५ धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना माइंडट्री संघाला ९ बाद १५७ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक ।
१) कॉग्निझंट – १९.५ षटकांत सर्वबाद ९८ (नितेश सप्रे ४०, वर्नित दीक्षित १४, विक्की मोंडल ४-१५, अजय पाटील २-१२) पराभूत वि. सीबीएसएल – १६.५ षटकांत ५ बाद १०२ (प्रसाद जैस्वार २४, केतन घाडगे नाबाद २३, निखिल जोशी १६, शरद पळसकर २-२०). सामनावीर- विक्की मोंडल
२) सिमन्स – २० षटकांत २ बाद २०२ (हिमांशू अगरवाल नाबाद ११५, नमन शर्मा नाबाद ६१, उदय गलांडे १-३६) वि. वि. माइंडट्री – २० षटकांत ९ बाद १५७ (भूषण जोशी ४३, पीयूष रॉय २४, दीपांशू गुप्ता २२, निरंजन फडणवीस ३-२६, राहुल माने २-२७, मनोजकुमार भागवत २-१६)सामनावीर- हिमांशू अगरवाल