पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या अवनीश चाफळे, तेज ओक यांनी तर मुलींच्या गटात श्रुती नानंजकर,मेहक कपूर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकित अवनीश चाफळे याने अव्वल मानांकित लक्ष्य गुजराथीचा 6-3, 2-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या तेज ओक याने गुजरातच्या चौथ्या मानांकित आकांश सुब्रमणियमचा 2-6, 6-3, 6-0 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सहाव्या मानांकित विवान कारंडे याने स्वराज ढमढेरेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(7-1) असा तर, दुसऱ्या मानांकित गुजरातच्या अक्षय सुब्रमणियमने महाराष्ट्राच्या अभिराम निलाखेचा 6-4, 6-2 असा पराभव केला.
मुलींच्या गटात बिगरमानांकित श्रुती नानंजकर हिने दुसऱ्या मानांकित मृण्मयी जोशीचा 6-2, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चौथ्या मानांकित प्रिशा शिंदेने आठव्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईचा 6-1, 6-1, असा तर, तिसऱ्या मानांकित अग्निमित्रा भट्टाचार्य हिने सिया प्रसादेचा 6-2, 6-1 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. सहाव्या मानांकित मेहक कपूर हिने पाचव्या मानांकित श्रेया पठारेचा 6-4, 6-3 असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी):
मुले:
अवनीश चाफळे(महा)वि.वि.लक्ष्य गुजराथी(महा)[1]6-3, 2-6, 6-1;
तेज ओक(महा)वि.वि.आकांश सुब्रमणियम(गुजरात)[4] 2-6, 6-3, 6-0;
विवान कारंडे(महा)[6]वि.वि.स्वराज ढमढेरे(महा)6-3, 7-6(7-1);
अक्षय सुब्रमणियम(गुजरात)[2]वि.वि.अभिराम निलाखे(महा)6-4, 6-2;
मुली:
श्रुती नानंजकर(महा)वि.वि.मृण्मयी जोशी(महा)[2] 6-2, 6-1;
मेहक कपूर(महा)[6]वि.वि. श्रेया पठारे(महा)[5] 6-4, 6-3;
प्रिशा शिंदे(महा)[4] वि.वि.देवांशी प्रभुदेसाई(महा)[8]6-1, 6-1;
अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[3] वि.वि.सिया प्रसादे(महा) 6-2, 6-1;
दुहेरी गट: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
अर्चित धूत/अर्जुन किर्तने वि.वि.अवनीश चाफळे/स्वराज ढमढेरे 6-3, 6-1;
अमोघ दामले/देव तुराकिया वि.वि.मनन अगरवाल/विश्वजीत सणस 6-2, 6-2;
तेज ओक/अभिराम निलाखे वि.वि.राघव अमीन/अनिकेत चौबे 4-6, 6-4, 10-6;
आकांश सुब्रमणियम/अक्षज सुब्रमणियम वि.वि.नीव कोठारी/कौशिक कचरे 7-6(5), 6-3.
मुली:
प्रिशा शिंदे/मेहक कपूर वि.वि.रितिका मोरे/ह्रितिका कापले 6-2, 6-2;
प्रतिष्ठा सैनी/रजिथा राजेश वि.वि.अभिलिप्सा मल्लिक/आर्या शिंदे 2-6, 6-1, 10-5;
श्रुती नानंजकर/मृण्मयी जोशी वि.वि.ध्रुवी आद्यांयंथया/सहाना कमलाकन्नन 6-2, 6-2;
सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई वि.वि.श्रीया जे एस/दुर्गा बिराजदार 6-1, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: ए अँड ए शार्क्स संघाचा दुसरा विजय