पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, सुजय महादेवन, गगनदीप वासू या खेळाडूंनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या केतन धुमाळ याने पाचव्या मानांकित संभाजी चव्हाणचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. बिगरमानांकीत सुजय महादेवन याने दुसऱ्या मानांकित गणेश देवखिळेवर 6-2, 6-0 असा सनसनाटी विजय मिळवला. 45वर्षांवरील पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने सुजित कुमार टीपीला 6-0, 6-1 असे पराभूत केले. अकराव्या मानांकित गगनदीप वासूने चौथ्या मानांकित राजीव अरोराचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 65वर्षांवरील गटात पाचव्या मानांकित एकनाथ किणीकरने चौथ्या मानांकित महेंदर कक्कडचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
60वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित दिपांकर चक्रवर्तीने श्रीकृष्ण कुलकर्णीचा 6-0, 6-1 असा तर, दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित अनिल निगमने शिरीष नांदुर्डीकरचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: 35वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
केतन धुमाळ(भारत)वि.वि.संभाजी चव्हाण(भारत)[5]6-1, 6-1;
अर्जुन उप्पल(भारत)[3]वि.वि.आदित्य अभ्यंकर(भारत)6-2, 6-4;
सुजय महादेवन(भारत)वि.वि.गणेश देवखिळे(भारत)[2]6-2, 6-0;
रवींद्रनाथ पांडे(भारत)[1]वि.वि.अभिषेक चव्हाण(भारत)6-2, 6-3;
40वर्षावरील पुरुष एकेरी: पहिली फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.अमित किंडो(भारत)6-4, 6-2;
रतिश रतुसारिया(भारत)वि.वि.प्रफुल नागवानी(भारत)6-4, 6-1;
रवी कोठारी(भारत)वि.वि.यशेश मुखी(भारत)7-5, 4-6, 10-7;
सुरेंद्र अल्लम(भारत)[8]वि.वि.कल्पेश मकणी(भारत)6-1, 6-2;
कौस्तुभ देशमुख(भारत)वि.वि.शांतीश परांजपे (भारत)6-4, 6-0;
स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[3]वि.वि.तुषार परदेशी(भारत)6-1, 6-1;
रमजान शेख(भारत)[5]वि.वि.नरेश कुमार अरोरा(भारत)6-0, 6-0;
45वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
नितीन कीर्तने(भारत)[1]वि.वि.सुजित कुमार टीपी(भारत)6-0, 6-1;
गगनदीप वासू(भारत)[11]वि.वि.राजीव अरोरा(भारत)[4]6-2, 6-1;
सुनील लुल्ला(भारत)[2]वि.वि.जयकिशन लखानी(भारत)[9]6-3, 6-2;
पराग शहा(भारत)[7]वि.वि.गिरीश कुकरेजा(भारत)
55वर्षांवरील पुरुष:
संजय कालगावकर(भारत)वि.वि.संतोष चिटणीस(भारत)6-4, 6-4;
उल्हास फुलझेली(भारत)वि.वि.धरमवीर सिंग(भारत)6-0, 6-2;
अजय कामत(भारत)वि.वि.कुबेर चावरे(भारत)6-1, 6-1;
60वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
दिपांकर चक्रवर्ती(भारत)[1]वि.वि.श्रीकृष्ण कुलकर्णी(भारत) 6-0, 6-1;
अनिल निगम(भारत)[2]वि.वि.शिरीष नांदुर्डीकर(भारत) 7-6(1), 6-0;
65वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
योगेश शहा(भारत)[1]वि.वि.टीएस गंभीर(भारत)[8]5-0 सामना सोडून दिला;
एकनाथ किणीकर(भारत)[5]वि.वि.महेंदर कक्कड(भारत)[4]6-1, 6-2;
राजेंद्र सिंग राठोड(भारत)[3] वि.वि.मृदुल बारकाकोटी(भारत)[6]6-1, 6-4;
अजितकुमार ब्लावेल्ली(भारत)वि.वि.दिलीपकुमार मेहता(भारत)6-0, 6-1;
70वर्षांवरील पुरुष:
अनिल सौंदत्तीकर(भारत)वि.वि.लक्ष्मण आंबुलकर(भारत)6-1, 6-3;
शिव मोर(भारत)वि.वि.पर्वथेसम जीनगम(भारत) 6-2, 6-2;
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्यात धावा करण्याची इच्छाही दिसत नाही’, महान क्रिकेटरने विराटच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्न
‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना
फ्लॉप ठरत असलेल्या विराटला तोंडावर बोलला मॅक्सवेल; म्हणाला, ‘आता मी तुझ्यासोबत बॅटिंग नाही करू शकत’