fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हॉकी पंजाबला तामिळनाडू संघाकडुन पराभवाचा धक्का

महाराष्ट्रावर उत्तरप्रदेशची 7-1 ने मात

औरंगाबाद: यथे सुरु झालेल्या नवव्या राष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गतवेळी चॅम्पीयन राहिलेल्या हॉकी पंजाब संघाला तामिळनाडू हॉकी संघाकडुन पराभवाचा झटका बसला. गतवर्षी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या हरियाणा संघाने मणिपुरला 7-0 ने धूळ चारली. यजमान हॉकी महाराष्ट्र संघाला उत्तरप्रदेश संघाने 7-1 च्या फरकाने मात दिली.

भारतीय खेळ प्राधिकरणतर्फे तयार करण्यात आलेल्या नव्या टर्फ मैदानावर या स्पर्धेची रविवारी (17 फेब्रुवारी) सुरुवात झाली. सलामीच्या लढतीत हॉकी पंजाब विरुद्धच्या लढतीत तामिळनाडूच्या एस. कार्थी या खेळाडूने चार गोल (6मी, 10मी, 35मी, 50मी) करत पंजाबला जोरदार दणका दिला. त्याने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातुन चालुन आलेल्या संधीचे सोने केले आणि तामिळनाडूला दणदणीत सुरुवात करुन दिली.

पहिल्या क्वॉर्टरमध्ये दणदणीत सुरुवात करुन सामन्यावर पकड मिळवणाऱ्या तामिळनाडूच्या विरोधात अ गटातील साखळी फेरीत 2-0 ची आघाडी घेतली होती.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये करजविंदर सिंग (17 मी.), प्रतिक शर्मा (19 मी.) यांनी पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे सोने करत दोन गोल केले. त्यानंतर सुदर्शन सिंग (22 मी.)ने तिसरा गोल करत 3-2 ती आघाडी पंजाबसाठी स्थापन केली. तामिळनाडूने 35 व्या मिनीटात कार्थीने केलेल्या गोलच्या जोरावर पिछाडीचे रुपांतर बरोबरीत केले.

शेवटच्या टप्प्यात कार्थीने 50 व्या मिनीटाला केलेल्या गोलने तामिळनाडूला पंजाब विरुद्ध 4-3 ची आघाडी मिळवुन दिली. प्रतिस्पर्धा संघाच्या प्रतिक शर्माने 51 व्या मिनीटात गोल करुन बरोबरी साधली. लगोलग 51 व्या मिनीटात के. तिरस या खेळाडूने तामिळनाडूसाठी पुढचा गोल करत आघाडी कायम केली, जी निर्णायक ठरली.

हॉकी चंडीगडचा दणदणीत विजय

त्याच गटाच्या पुढील साखळी फेरीत हॉकी चंडीगडने सर्व्हीसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) चा 7-4 च्या फरकाने पराभव केला. साहिबजित सिंगने 8व्या, 48 व्या, 60 व्या मिनीटांत केलेल्या गोलच्या साथीने स्थापन केलेली आघाडी मनिंदर सिंगने पुढे नेत 45 आणि 47 व्या मिनीटात ही आघाडी वाढवली. हाशिम (2 मी.), हरप्रित सिंग (9 मी.) यांनीही या आघाडीत भर घातली. दुसरीकडे एसएससीबी जॉर्सन मेईरबाम (30 मी., 40 मी.) याने दोन तर डीयु मोक्‍शीत ने 50 व्या मिनीटात आणि मनदिप केरकेटाने 24 व्या मिनीटात केलेले गोल चंडीगडची आघाडी काही अंशी कापण्यात कामी आले.

हॉकी झारखंड, हरियानाची ब गटात आघाडी

ब गटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत मध्येप्रदेश हॉकी अकादमी संघाला हॉकी झारखंडने 1-0 च्या फरकाने नमवले. झारखंडच्या दिपक सोरेंगने सामन्यातील एकमेव गोल 45 व्या मिनीटात केला.

याच गटातील आणखी एका सामन्यात गतवेळता उपविजेता हरियाणा संघाने मणिपुरला 7-0 ने मागे टाकले. हरियाणाने तिसऱ्याच मिनीटात परमीतने गोल केला आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर धामी (3 मी.), पवन (15 मी.), अंकुश (35 मी.), रिमांशु (44 मी.), धामी (45 मी.), पंकज (59 मी.) यांनी हरियाणासाठी 7-0 ची आघाडी कायम केली.

हॉकी महाराष्ट्र संघाकडुन निराशा

यजमान हॉकी महाराष्ट्र संघाला आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना पहिल्याच साखळी सामन्यात उत्तरप्रदेश हॉकी विरुद्ध 7-1 च्या फरकाने पराभवाचा चटका सोसावा लागला. पहिल्यांदाच आमनेसामने आलेल्या उभय संघांमध्ये झालेल्या या लढतीत उत्तर प्रदेशच्या गोपीकुमार सोनकर ने दणदणीत पाच गोल (3 मी, 4 मी, 34 मी, 45मी, 52 मी.) करत महाराष्ट्राला नमवण्यात महत्वाची भुमिका बजावली.

पहिल्या क्वॉर्टरमध्ये महाराष्ट्र संघावर दोन गोल करत उत्तप्रदेशने आघाडी मिळवली होती. मात्र महाराष्ट्राच्या आमिद खानने 28 व्या मिनीटात गोल करत सामन्यतील महाराष्ट्राच्या आशा कायम ठेवल्या होत्या. त्यानंतर उत्तरप्रदेश हॉकी संघाने हल्ला अधिक तीव्र केला. उत्तरप्रदेशच्या अजय यादवने 33 आणि 44 व्या मिनीटात गोल करत ही आघाडी पुढे नेली आणि निर्णायक विजय मिळवला.

गतवर्षी उपांत्य फेरी गाठणाऱ्या हॉकी गंगपूर-ओडीशा संघाने दिल्ली विरुद्धचा सामना 3-3 च्या बरोबरीत सोडवला. पुरण करकेट्टा (18 मी.) ने गंगपूर ओडिशा संघाला आघाडी मिळवुन दिली. त्यांच्या संघाच्या सिब्रन लाक्रा (37 मी.) आणि सुदीप चिर्माको (36 मी.) यांनी दोन गोल केले. दिल्लीकडुन अमित (19मी.), चेतन शर्मा (34मी.), साहिल कुमार (36 मी.) यांनी गोल केले.

गट ड मध्ये रविवारी (17 फेब्रुवारी) एकच सामना खेळवण्यात आला. या मध्ये हॉकी ओडिशा आणि स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड (एसएससीबी) ला 1-1 ने ड्रॉ झाला. पहिल्या हाफमध्ये गाले झाला नसला तरी हॉकी ओडिशाच्या सुभाष बारलाने 42 व्या मिनीटात पेनल्टी कॉर्नरच्या आधारे पहिला गोल केला. त्याला 57 व्या मिनीटात एसएससीबीच्या किंगस्टन थॉकचॉमने बरोबरी करुन उत्तर दिले.

 

निकाल:

गट अ ः तामिळनाडू हॉकी युनिट ः 5 (एस. कार्थी 6मी, 10मी, 35मी, 50मी. के. तिरस 51 मी.) वि. वि. हॉकी पंजाब ः 4 (करजविंदर सिंग 17 मी, पर्तिक शर्मा 19, 51 मी, सुदर्शन सिंग 22 मी.) हाफ टाईम ः 2-3

हॉकी चंडीगड ः 7 (हाशिम 2मी, साहिबजिंत सिंग 8 मी, 48 मी, 60 मी. हरप्रितसिंग 9 मी, मनिंदर सिंग 45मी, 47मी) वि. वि. एसएससीबी ः 4 (जॉर्सन मेईरबाम 30मी, 40 मी, डीयु मोक्‍शीत 50मी, मनिप केरकेट्टा 24 मी). हाफ टाईम 3-2

गट ब ः हॉकी हरियाणा ः 7 (परमित 3मी, धामी बॉबी सिंग 3मी, 45मी., पवन 15 मी, अंकुश 36 मी, रिमांशु 44 मी, पंकज 59 मी.) वि. वि मणिपुर ः 0. हाफ टाईम 3-0

हॉकी झारखंड ः 1 (दिपक सोरेंग 45 मी.) वि. वि,. मध्येप्रदेश हॉकी अकादमी ः 0

गट क ः हॉकी गंगपूर ओडिशा ः 3 (पुरण केरकेट्टा 18 मी, सिब्रेन लाक्रा 37 मी, सुदिप चिर्माको 43 मी.) बरोबरी वि. दिल्ली हॉकी ः 3 (अमित 19 मी, चेतन शर्मा 34 मी, साहिल कुमार 36 मी.) हाफ टाईम ः 1-1

गट क ः उत्तरप्रदेश हॉकी ः 4 (गोपीकुमार सोनकर 3मी, 4 मी, 34 मी, 45 मी 52 मी. अजय यादव 33मी, 44 मी). विवि. हॉकी महाराष्ट्र ः 1 (अमिद खान 28 मी.) हाफ टाईम 2-1

गट ड ः हॉकी ओडिशा ः 1 (सुभाष बारला 42मी) ड्रॉ वि. स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड (एसपीएसबी) ः 1 (किंगस्टन थॉकचॉम 57 मी.). हाफ टाईम 0-0

You might also like