पुणे। एचएसबीसी, मर्स्क या संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवडमधील टेल्को मैदानावर झालेल्या लढतीत एचएसबीसी संघाने टिया संघावर ८६ धावांनी मात केली. एचएसबीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७५ धावा केल्या. यात गणेश मिसाळने १७ चेंडूंत ३१, तर शशांक सोलंकीने २८ चेंडूंत ३५ धावा केल्या. यानंतर एचएसबीसी संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून टिया संघाला १७.५ षटकांत ८९ धावांत गुंडाळले.
यानंतर झालेल्या दुस-या लढतीत मर्स्क संघाने कॉग्निझंट संघावर पाच गडी राखून मात केली. कॉग्निझंट संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मर्स्कने विजयी लक्ष्य पाच गडींच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक – १) एचएसबीसी – २० षटकांत ७ बाद १७५ (शशांक सोलंकी ३५, गणेश मिसाळ ३१, श्रावण नाईक २७, धवल बडगुजर २६, अंगद जैन २-३३, प्रणय मोरे २-३७) वि. वि. टिया – १७.५ षटकांत सर्व बाद ८९ (फिरोज पिंजारी १८, रोहित धोर १७, अनुज वर्मा ३-२३, निशांत २-१२). सामनावीर – अनुज वर्मा
२) कॉग्निझंट – २० षटकांत ६ बाद १५५ (करण केसरकर नाबाद ६७, अक्षय कुलकर्णी ५०, मंगेश सांडगावकर २-२७, प्रसाद गिरकर २-२८) पराभूत वि. मर्स्क – २० षटकांत ५ बाद १५६ (प्रसाद गिरकर ५८, वैभव महाडिक ४२, गौरव कुलकर्णी २-२२, मिन्हाज अली २-३०). सामनावीर – प्रसाद गिरकर