आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे महान अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांचा लवकरच एक मोठा सन्मान होणार आहे. हा सन्मान त्यांना त्यांच्या शहरात मिळणार आहे. एका स्टेडियमला कपिल देव यांचे नाव देण्यात येणार असून, हे स्टेडियम सध्या चंदीगडमध्ये तयार होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चंदीगडमधील सेक्टर १६ क्रिकेट स्टेडियम कपिल देव स्टेडियम म्हणून ओळखले जाईल. युनियन टेरीटरी क्रिकेट असोसिएशनने (युटीसीए) यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कपिल देव यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात याच स्टेडियममधून केली होती. (Sector 16 Stadium Renamed As Kapil Dev Stadium)
युटीसीएच्या अधिकार्यांनी सांगितले की, कपिल देव यांचे नाव स्टेडियमला देण्याची आमची इच्छा आहे. याशिवाय या स्टेडियमच्या पॅव्हेलियनला महान अष्टपैलू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) नाव दिले जाऊ शकते. यूटीसीएचे अध्यक्ष संजय टंडन यांनी माध्यमांना सांगितले की, “आम्ही तत्कालीन प्रशासक व्हीपी सिंग बदनोर यांची भेट घेऊन सेक्टर १६ स्टेडियमला कपिल देव यांचे आणि पॅव्हेलियनला युवराज सिंगचे नाव देण्याबाबत चर्चा केली होती. आता हा निर्णय लवकरच पूर्णत्वास येईल.”
सेक्टर १६ स्टेडियम हे कपिल देव यांचे होम ग्राउंड मानले जाते. त्यांच्याशिवाय भारतीय संघाची अनेक वर्ष सेवा करणारे युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे देखील याच मैदानावर सुरुवातीच्या काळात क्रिकेट खेळले होते. भारताचे सर्वकालीन महान अष्टपैलू असलेल्या कपिल देव यांनी मंगळवारी (८ मार्च) युटीसीएने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू राज बावा (Raj Bawa) आणि सलामीवीर हरनूर सिंग (Harnoor Singh) यांची भेट घेतली. कपिल यांनी त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. तसेच, या खेळाडूंमुळे भारतीय क्रिकेटचा भविष्य उज्ज्वल असल्याचे देखील म्हटले.
महत्वाच्या बातम्या-
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)