इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सत्राच्या सरावासाठी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई गाठली आहे. आयपीएलच्या फ्रँचायझीने निवेदनात म्हटले होते की, चेन्नई संघ मुंबईत एका महिन्याच्या सराव शिबिराचे आयोजन करणार असून सीएसकेला आपले पहिले पाच सामने मुंबईतच खेळावे लागणार आहेत. तर उर्वरीत सामने कोलकाता आणि बंगळूर या ठिकाणी खेळायचे आहेत.
आता तीन वेळच्या विजेत्या असलेल्या चेन्नई सुपर किंग्नेज अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजल फारूकी याच्याशी नेट गोलंदाज म्हणन करार केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) याची घोषणा करत फारुकीची चेन्नईला निघालेली छायाचित्रे ट्विट केली आहेत.
एसीबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “युवा वेगवान गोलंदाज फजलक फारुकीने भारतात जाण्यासाठी देश सोडला असून तेथे तो आयपीएलच्या आगामी सत्रात सीएसकेचा नेट गोलंदाज म्हणून खेळणार आहे.” फारुकीने 20 मार्च रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसर्या टी -20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने अफगाणिस्तानकडून गोलंदाजीला सुरुवात करताच पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने पहिला बळी घेतला होता.
सीएसकेचे तयारी शिबीर गुरुवारी चेन्नईहून मुंबईला हलविण्यात आले आहे. सीएसके आपले पहिले पाच सामने मुंबई येथे खेळणार असून त्यांचा पहिला सामना 10 एप्रिलला दिल्ली संघाबरोबर होणार आहे. पंजाब किंग्ज सोबत 16 एप्रिलला, राजस्थान रॉयल्ससोबत 19 एप्रिलला, कोलकाता नाईट रायडर्ससोबत 21 एप्रिलला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी 25 एप्रिलला होणार आहे. मागील हंगामात प्रथमच प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरलल्या सीएसकेने हंगामातील एकूण 14 सामन्यांतील एकूण 6 सामने जिंकले होते. यंदा हा इतिहास बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् राहुलच्या फ्लॉप शोवर पूर्णविराम! शतक केल्यानंतर पकडले कान, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न