वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यात चेन्नई संघाने ६९ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच चेन्नई संघाने गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे. एकीकडे विजयाचा जल्लोष असताना दुसरीकडे संघातील वरिष्ठ सदस्याने जगाचा निरोप घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे संचालक आणि अध्यक्ष एल सबारत्नम यांचे वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबातील एका सदस्याने दिली आहे. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने चेन्नई संघावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सबारत्नम यांच्या कुटुंबात २ मुले आहेत आणि १ मुलगी आहे. त्यांनी भरपूर वर्ष चेट्टिनाद सीमेंट कॉरपोरेशनमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळला. यापूर्वी ते चेन्नई पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑयल कॉरपोरेशनचे देखील संचालक होते. तसेच सबारत्नम इंडिया सीमेंट्सचे सल्लागार होते आणि कोरोमंडल सूगर्सचे संचालक आणि सीईओ देखील होते.
चेन्नई सुपर किंग्ज आपल्या आधीच्या रंगात आल्यासारखे दिसून येत आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई संघाने या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रविवारी (२५ एप्रिल) बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई संघाने ६९ धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईचा पुढील सामना २८ एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद संघासोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या षटकात गगनचुंबी षटकार मारताचं जड्डूने पत्नीला दिली ‘फ्लाइंग किस’, फोटो तूफान व्हायरल
धोनीने जडेजाला ‘तो’ सल्ला दिला नसता, तर त्याने विसाव्या षटकात ३७ धावा चोपल्याच नसत्या!
रविंद्र जडेजाची तुफान फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी अवाक्; म्हणाली, ‘हा तर जंगली अवतार’