मुंबई । चेन्नई सुपर किंग्ज संघ चांगलाच संकटात सापडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे अनुभवी खेळाडू सुरेश रैना भारतात परतला आहे आणि तो आयपीएलचा 13 वा हंगाम खेळणार नाही. तसेच प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार स्टार गोलंदाज दीपक चहर आणि फलंदाज ऋतुराज गायकवाड यांच्यासह चेन्नई सुपर किंग्स संघातील 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहेत.
संपूर्ण टीम अद्याप क्वारंटाईनमध्ये आहे. पण अजून सीएसके संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग युएईला आलेले नाही. तो मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी तो युएईला पोहोचेल.
खरं तर, वैयक्तिक कारणांमुळे, यापूर्वी तो संघाबरोबर युएईला आला नव्हता. तथापि, युएईला जाण्यापूर्वी त्याला भारतात दोन कोरोना टेस्ट द्याव्या लागतील आणि अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो रवाना येईल.
युएईला पोहोचल्यानंतरही तो त्वरित संघाला भेटू शकणार नाही. संघापासून तो सात दिवस वेगळे राहणार आहे.
हरभजन सिंग संघात रुजू झाल्यानंतर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आणखीन मजबूती मिळेल. एमएस धोनीनंतर हरभजन सिंग चेन्नई संघातला सर्वात अनुभवी खेळाडू आहे. 40 वर्षीय हरभजनने यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त ४२ डावात मिळवला अव्वल नंबर; भारताच्या या दिग्गजाने केला होता हा पराक्रम
तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…
वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून
तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा