आयपीएल 2021 च्या शुक्रवारी (16 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या चमकदार कामगिरीच्या मदतीने चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्ज विरुद्ध एकतर्फी सामन्यात सहा गडी राखून यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय नोंदविला. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीचा आयपीएलमध्ये या संघात हा 200 वा सामना होता. सामना संपल्यानंतर सीएसके संघातील खेळाडूंनी 200 वा सामना खेळण्याच्या निमित्ताने कर्णधार धोनीचे खास पद्धतीने अभिनंदन केले.
सीएसकेने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचे फोटो शेअर केले असून त्यामध्ये धोनी केक कापताना दिसत आहे. त्याच्याबरोबर सॅम करन, रॉबिन उथप्पा, पियुष चावला आणि इतर खेळाडूही दिसत आहेत.
A treat to Thala on his 200th and icing on the cake for all of us! #Thala200 #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/ErkDrHewdZ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2021
Happy 200* THALA 😍💛#Thala200 #PBKSvCSK #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/RdAyQM0hnO
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 16, 2021
A treat to Thala on his 200th! Phenomenal Team effort from the boys, special mention to Cherry swings! On to the next one! #Believe @ChennaiIPL #CSK pic.twitter.com/w8UaLAX2lU
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 16, 2021
आयपीएल कारकीर्दीत धोनीने चेन्नईकडून एकूण 176 सामने खेळले असून चॅम्पियन्स लीग टी-20 मध्येही तो चेन्नईकडून 24 सामने खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून 200 सामने खेळणार्या धोनीने आपल्या नेतृत्वाखाली 3 वेळा सीएसकेला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वात त्याने सीएसकेला चॅम्पियन्स लीग टी-20 मध्येही दोन वेळा विजेतेपद जिंकवून दिले आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने केएल राहुलच्या संघाला 20 षटकांत आठ बाद 106 धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजी करताना 15.4 षटकांत 107 धावा करून सहा गडी राखून सहज विजय मिळविला. या सामन्यात सीएसकेचा सलामी फलंदाज रुतूराज गायकवाड ५ धावा करून लवकर तंबूत परतला. परंतु नंतर फाफ डु प्लेसिस आणि मोईन अलीने दुसर्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. यामध्ये मोईन अली 31 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांसह 46 धावा करून बाद झाला. तर फाफ डु प्लेसिसने नाबाद 36 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान ‘हाई वोल्टेज’ सामन्यांचा थरार, पाहा कधी आणि कोठे होणार मॅच
जड्डूच्या लक्षणीय क्षेत्ररक्षणाचा चाहर बनला चाहता; म्हणाला, ‘मला मैदानावर असे ११ जडेजा पाहिजेत’
‘वडिलांचा पैसा वाया घालवतेस,’ म्हणणाऱ्या महिलेची सचिनच्या लेकीने ‘अशी’ केली बोलती बंद