इंडियन प्रीमीयर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२) बिगूल वाजले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मोठ्या हंगामासाठी वेळापत्रकही जाहीर केले आहे. आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाचा पहिला उद्घाटन सामना २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा असे होईल, जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ आयपीएल हंगामातील उद्घाटनाचा सामना (IPL 2022 First Match) खेळतील. यापूर्वी वर्ष २०११ मध्ये चेन्नईने हंगामातील पहिला सामना कोलकाताविरुद्ध खेळला होता. या सामन्यात चेन्नईने २ गुणांच्या फरकाने विजय मिळवला होता.
चेन्नई आणि कोलकाता संघाची आमने सामने कामगिरी
उभय संघांची आमने सामने कामगिरी (CSK vs KKR Head To Head Records) पाहायची झाल्यास, आतापर्यंत चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) संघांमध्ये २६ सामने झाले आहेत. त्यापैकी १७ सामन्यांमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. तर कोलकाता संघाला ८ सामने जिंकण्यात यश आले आहे. दोन्ही संघातील एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
चेन्नई आणि कोलकाता संघाची आयपीएलमधील कामगिरी
चेन्नई संघाने आतापर्यंत १२ वेळा आयपीएलमध्ये त्यांचा पहिला सामना खेळताना त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत. हा संघ बंदीमुळे २ हंगामांना मुकला होता. तसेच एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सर्वप्रथम २०१० मध्ये त्यांनी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये हा संघ विजेता राहिला आहे. तर कोलकाता संघाने गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली २०१२ आणि २०१३ मध्ये आयपीएल चषकावर त्यांचे नाव कोरले होते.
हेही वाचा- अस्सल मुंबईकर ‘तात्या’ आले! पोलार्डच्या आगमनाचा खास व्हिडिओ पाहाच
चेन्नई सुपर किंग्ज संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग
कोलकाता नाईट रायडर्स संघ – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, पॅट कमिन्स, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजित, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्स हेल्स, चीम साऊथी, रमेश कुमार, उमेश यादव, मोहम्मद नबी, अमन खान
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नरने हातोड्याने कराचीच्या खेळपट्टीवर घेतली मेहनत; पत्नी ट्रोल करत म्हणाली, ‘तू घरीही अशीच…’
मोठी बातमी! शारापोव्हा आणि शुमाकर यांच्यावर गुडगाव पोलिसांकडून फसवणूकीचा गुन्हा दाखल, प्रकरण गंभीर