इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. मात्र, रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सामन्यात अखेर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. सीएसके आता आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही.
नियोजित कार्यक्रमानुसार हा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाणार होता. मात्र, या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. परिणामी सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (29 मे) खेळवण्यात आला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल व वृद्धिमान साहा या जोडीने संघाला पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी दिली. गिलने 39 तर साहाने 54 धावांचे योगदान दिले. मात्र, गुजरातच्या डावाचा नायक युवा साई सुदर्शन हा ठरला. त्याने 47 चेंडूवर 96 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या योगदानामुळे गुजरातने 4 बाद 214 धावा केल्या.
अंतिम सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचांनी सीएसकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान दिले होते. ऋतुराज आणि कॉनवेने दिलेली चांगली सुरुवात आणि त्यानंतर मध्यक्रम आणि तळातील फलंदाजांच्या योगदानामुळे सीएसकेने हा सामना जिंकला. सोमवारी अंबाती रायुडू आपला शेवटचा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात आला होता. शेवटच्या 18 चेंडूत सीएसकेला विजयासाठी 38 धावा हव्या होत्या अशा परिस्थिती रायुडूने मोहित शर्मा याला पहिल्या तीन चेंडूवर दोन षटकार आणि एक चौकार मारला. मोहितने टाकलेल्या 13व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मात्र रायुडू झेलबाद झाला. रायुडूने 8 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. रायुडूच्या विकेटनंतर भारताचा सर्वोत्तम फिनिशर अशी ओळख असणारा एमएस दोनी खेळपट्टीवर आला. पण आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने डिविड मिलरच्या हातात झेल दिला आणि शुन्य धावांवर विकेट गमावली. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये सीएसकेला विजयासाठी 22 धावा हव्या होत्या.
गोलंदाजांच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर तुषार देशपांडे सीएसकेला चांगलाच महागात पडला. तुषारने 4 षटकांमध्ये 56 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. दीपक चाहर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 38-38 धावा कर्च करून प्रत्येक एक-एक विकेट घेतली. मथिशा पथिराना याने 44 धावा कर्च करून दोन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे गुजरातसाठी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा पुन्हा एकदा चमकदार प्रदर्शन करू शकला. मोहिनेत आपल्या तीन षटकांमध्ये … धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. नूर अहमद याने तीन षटकात 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. (Chennai Super Kings won their fifth IPL trophy)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान