चेन्नई, ११ फेब्रुवारी : चेन्नईयन एफसीच्या हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या प्ले ऑफच्या आशा मावळल्या आहेत. चेन्नईयन एफसी रविवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ईस्ट बंगाल एफसीचा सामना करणार आहे. या दोन्ही संघांमध्ये केवळ दोन गुणांचा फरक आहे.
चेन्नईयन एफसीला मागील ८ सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही आणि रविवारी ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा निर्धार आहे. ईस्ट बंगालला हिरो आयएसएलमध्ये चेन्नईयनवर विजय मिळवता आलेला नाही. पण, चेन्नईयनची यंदाच्या पर्वातील कामगिरी काही खास झालेली नाही. यंदाच्या पर्वात घरच्या मैदानावर ८ पैकी १ विजय मिळवता आलेला आहे. चार सामने अनिर्णित राहिले, तर तीनमध्ये हार झाली.
अल खयातीने मागील आठवड्यात केरळा ब्लास्टर्सविरुद्ध गोल केला आणि यंदाच्या पर्वातील त्याने ९ गोल केले आहेत. खयातीने ४ गोलसाठी सहाय्य केले आहेत. सहकारी पीटर स्लिस्कोव्हिचनेही ८ गोल व ४ गोलसहाय्य केले आहेत. ”आम्हाला मेहनत घेण्याची आणि अनुभवातून शिकण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्याकडे अजूनही उद्दिष्टे आहेत. आज आमची खेळाडूंसोबत बैठक झाली आणि मी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे स्पष्ट शब्दात कळवले. आमच्याकडे तीन सामने आहेत आणि या तीन सामन्यांमध्ये मला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत आणि तेच लक्ष्य आहे,” असे मुख्य प्रशिक्षक थॉमस ब्रॅडारिच म्हणाले.
ईस्ट बंगाल एफसीची यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील कामगिरी काहीशी चांगली झालेली आहे. घरच्या मैदानावर त्यांना ९ पैकी दोन विजय मिळवता आले आहेत आणि १ सामना अनिर्णित राखला आहे. तेच घराबाहेर त्यांनी ८ पैकी तीन सामने जिंकले आहेत. मागील आठवड्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध ते विजयाच्या नजीकच होते, परंतु त्यांना ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. उद्याच्या सामन्यातील निकाल ईस्ट बंगालला आठव्या क्रमांकावर नेणारा ठरेल. क्लेइटन सिल्वा आणि नव्याने दाखल झालेला जेक जेर्व्हिस यांनी मागील सामन्यात गोल केले. क्लेइटन सिल्वा हा यंदाच्या पर्वात सर्वाधिक १२ गोल करून अव्वल स्थानावर आहे. जेर्व्हिस पर्वातील दुसऱ्या गोलच्या प्रयत्नात दिसेल.
“आम्ही पहिल्या सहामध्ये नाही, जिथे आम्हाला असायला हवे होते, परंतु आम्ही पहिल्या सहामध्ये येण्याची तयारी करत आहोत. हैदराबाद एफसी आदल्या पर्वात शेवटच्या स्थानावर होते आणि पुढील पर्वात त्यांनी जेतेपद पटकावले. आशा आहे की, आम्ही आमच्याकडे जे काही आहे त्यावरून मजबूत संघ तयार करू शकू, आणखी काही खेळाडूंना करारबद्ध करू आणि पुढील पर्वात अधिक चांगले आणि अधिक स्पर्धात्मक बनू,” असे स्टीफन कॉन्स्टन्टाईन म्हणाले. हिरो आयएसएलमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेले पाचपैकी चार सामने ड्रॉ राहिले आहेत. चेन्नईयन एफसीने यंदाच्या पर्वात ईस्ट बंगालवर एकमेव विजय मिळवला होता. (Chennaiyin FC will face East Bengal FC on Sunday after their play-off hopes have been dashed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितवरच फोकस करत होता कॅमेरामन, कॅप्टनची सटकताच दिली ‘अशी’ रिऍक्शन; म्हणाला, ‘अरे ये…’
‘मी तर फाशीच घेतली असती…’, विराटचे नाव घेत ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जहरी टीका