विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून, तेथे त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळेल. त्यातील पहिला सामना काउंटी एकादश विरुद्ध डरहॅम येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज झटपट माघारी परतले. भरवशाच्या चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला.
विराटविना खेळतोय भारतीय संघ
भारतीय संघाचा पहिला सराव सामना डरहॅम येथील चेस्टर ले स्ट्रीटच्या रिव्हर साईड मैदानावर खेळला जातोय. या सराव सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सहभाग घेतला नाही. त्यासह, सर्वात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालादेखील संघात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे या संघाचे नेतृत्व अनुभवी रोहित शर्माकडे देण्यात आले.
भारताची खराब सुरुवात
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः रोहित आणि मयंक अगरवाल भारतातर्फे सलामीला आले. मात्र, रोहित ३३ चेंडूंमध्ये ९ धावा काढून लिंडन जेम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. संघाच्या ४१ धावा झाल्या असताना मयंकला जेम्स यानेच त्रिफळाचीत केले. त्याने ३५ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने २८ धावा काढल्या.
चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म कायम
रोहित आणि मयंक बाद झाल्याने भारताच्या आशा अनुभवी चेतेश्वर पुजारावर पल्लवित झालेल्या. आपल्या नेहमीच्या अंदाजात सुरुवात केली. मात्र, त्याच्या २१ धावा झाल्या असताना तो फिरकीपटू जॅक कार्सनच्या चेंडूवर चकला आणि यष्टीरक्षक जेम्स र्यू याने त्याला यष्टिचित केले.
Carson x Rew, Pujara gone. ????????????????????????????????????@SussexCCC ???? @SomersetCCC
Live Stream ➡️ https://t.co/JeTNRWzv2g pic.twitter.com/aB1jPQLNTT
— Durham Cricket (@DurhamCricket) July 20, 2021
चेतेश्वर पुजारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याला खाते खोलण्यासाठी ३५ चेंडू लागलेले. तो या डावात ५४ चेंडूत केवळ ८ धावा काढू शकलेला. तसेच, दुसऱ्या डावातही त्याने फक्त १५ धावा बनविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान
बोल्ड होऊनही मयंकचा बसेना विश्वास, काही सेकंद एकाच स्थितीत राहिला उभा, व्हिडिओ होतोय व्हायरल