भारतीय संघाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड पार केला. पुजारा भारतीय संघाचा 13 वा फलंदाज बनल, ज्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 सामने पूर्ण केले. शुक्रवारी भारतीय संघाच्या पांढऱ्या जर्सीत पुजाराने मैदानात पाय ठेवताच हा विक्रम त्याच्या नावावर झाला. तत्पूर्वी विराट कोहली याने मागच्या वर्षी स्वतःचे 100 कसोटी सामने पूर्ण केले होते.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारतीय संघातील महान फलंदाजांपैकी एक आहेत आणि त्यांनी संघासाठी सर्वात पहिल्यांदाच 100 कसोटी सामन्यांच्या टप्पा पार केला होता. 1984 साली गावसकरांनी ही कामगिरी केली होती. त्यानंतर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी 1988 साली स्वतःचे 100 कसोटी सामने पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारे भारताचे दुसरे क्रिकेटपटू बनला. कपिल देव (Kapil Dev) 1989 साली अशी कामगिरी करणारे तिसरे भारतीय बनले. सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) याचे नाव चौथ्या क्रमांकावर येते. सचिनने 2002 साली स्वतःचे 100 कसोटी सामने पूर्ण केले.
वाचवा क्रमांक अनिल कुंबळे (2005) यांच्या आहे. त्यानंतर सहावा क्रमांक सध्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (2006), सातव्या क्रमांकावर सौरव गांगुली (2007), आठव्या क्रमांकावर वीवीएस लक्ष्मण (2008) आहे. नवव्या क्रमांकावर विरेद्र सेहवाग (2012), दहाव्या क्रमांकावर फिरकीपटू हरभजन सिंग (2013), 11व्या क्रमांकावर ईशांत किशन (2021) आहे. मागच्या वर्षी विराटने ही कामगिरी केल्यानंतर तो अशी कामगिरी करणारा 12वा भारतीय खेळाडू बनला होता. शुक्रवारी (2023) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara ) या यादीत 13व्या कर्मांकावर नव्याने जोडला गेला.
भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू
सुनिल गावसकर – 1984 (लाहोर)
दिलीप वेंगसरकर – 1988 (मुंबई)
कपिल देव – 1989 (कराची)
सचिन तेंडुलकर – 2002 (ओव्हल)
अनिल कुंबळे – 2005 (अहमदाबाद)
राहुल द्रविड – 2006 (नागपूर)
सौरव गांगुली – 2007 (मेलबर्न)
वीवीएस लक्ष्मण – 2008 (नागपूर)
विरेंद्र सेहवाग – 2012 (मुंबई)
हरभजन सिंग – 2013 (चेन्नई)
इशांत शर्मा – 2021 (अहमदाबाद)
विराट कोहली – 2022 (मोहाली)
चेतेश्वर पुजारा – 2023 (दिल्ली)
(Cheteshwar Pujara completed his 100 Test matches in Delhi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! आधी गौप्यस्फोट, नंतर आरोपांची सरबत्ती; अखेर राजीनामा देत चेतन शर्मांचा मोठा निर्णय
‘तुम्ही 6 फुट 5 इंच उंचीचा गोलंदाज घेऊन या’, राहुल द्रविड यांची चक्क पत्रकाराकडे मागणी