नवी दिल्ली । सध्या संंपूर्ण जग कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराशी लढत आहे. या व्हायरसमुळे अधिकतर देशांंमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. पूर्वीसारखी परिस्थिती केव्हा होईल कोणालाही माहित नाही. सध्या जो ठीक आहे, तो आपल्या घरात आहे आणि जो या व्हायरसमुळे बाधित आहे, तो रुग्णालयामध्ये लढत आहे.
अशामध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आपल्या सर्वात मोठ्या चाहत्याची ज्याप्रकारे मदत केली आहे, ते पाहून सगळीकडून त्याची प्रशंसा केली जात आहे.
खरंतर, पुजाराचा सर्वात मोठा चाहता अहमदाबादच्या रुग्णालयात कोरोना व्हायरसशी (Corona Virus) लढत आहे. पूर्वी हा चाहता स्टेडियममध्ये जाऊन पुजाराचा उत्साह वाढवत होता आणि आता पुजारा या घातक आजाराशी लढण्यासाठी चाहत्याला प्रोत्साहन देत आहे.
पुजाराने चाहत्याशी केली व्हिडिओ कॉलिंगमार्फत चर्चा-
पुजाराने व्हिडिओ कॉलिंगमार्फत आपल्या चाहत्याशी चर्चा केली आहे. त्याने व्हिडिओ कॉलिंगचा (Video Calling) स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबरोबरच त्याने लिहिले की, “हार्दिक ठीक होत आहे. मी अहमदाबादच्या आपल्या एका चाहत्याशी चर्चा केली आहे. जो कोविड-१९शी लढत आहे. मी प्रार्थना करतो की, हार्दिक लवकरच ठीक होईल.”
पुजारा सध्या होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि गुजरात सहाय्यता निधीमध्ये मदत दिली होती. त्याने आरोग्य कर्मचारी आणि या व्हायरसच्या परिस्थितीत पुढे येऊन काम करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे.
पुजाराने सौराष्ट्र संघाकडून (Team Saurashtra) रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. यापूर्वी तो न्यूझीलंड दौऱ्यावर होता. त्यावेळी त्याला काऊंटी मोसमासाठी इंग्लंडला जायचे होते, परंतु इंग्लंडने १ जुलैपर्यंत क्रिकेटवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्याचा करारदेखील रद्द करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-केवळ १ टी२० सामना खेळणारे जगातील ५ प्रसिद्ध क्रिकेटर
-ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम