भारतीय संघातून बाहेर करण्यात आलेला अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजार सद्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळत आहे. या स्पर्धेत त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. आयपीएलच्या आधी मायदेशीत श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून पुजाराला वगळले गेले होते. यानंतर त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. याच स्पर्धेतील त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला एक उत्कृष्ट षटकार मारतो.
काउंटी क्रिकेट संघ ससेक्सचे चेतेश्वर पुजार (Cheteshwar Pujara) प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याने चालू हंगामात संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) मिडेलसेक्सचे प्रतिनिधित्व करत आहे. सध्या ससेक्स आणि मिडेलसेक्स यांच्यात चार दिवसीय सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात ससेक्सने अवघ्या ६ धावांवर त्यांच्या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या आणि चेतेश्वर पुजार फंलदाजीसाठी आला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुजाराचा देखील शाहीन अफ्रिदीशी सामना झाला. शाहीनच्या विरोधात फलंदाजी करताना पुजाराने आक्रमक रूप धारण केले. आफ्रिदीने टाकलेल्या बाउंसर चेंडूवर पुजाराने एक उत्कृष्ट अपर कट शॉट खेळला आणि हा चेंडू हवाई मार्गाने थेट सीमारेषेपार जाऊन पडला. त्याचा हा षटकार पाहून सोशल मीडियावर चाहते त्याचे चांगलेच कौतुक करत आहेत. पहिल्या डावात पुजारा अवघ्या १६ धावा करून बाद झाला होता, पण दुसऱ्या डावात त्याने शतक पूर्ण केले आहे आणि खेळपट्टीवर अजूनही कायम आहे. सध्या ससेक्स २७५ धावांनी आघाडीवर आहे.
Cheteshwar Pujara hits a Six off Shaheen Shah Afridi.
🎥 Sussex Cricket YouTube channel#Sussex #Pujara #Shaheen #Middlesex #SUSvMDX pic.twitter.com/Tzrqvm4M76— Cric Top Class (@crictopclass) May 7, 2022
दरम्यान मागच्या जवळपास वर्षभरापासून पुजारा चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकला नव्हता. याच कारणास्तव भारतीय संघातून त्याला वगळले गेले आणि तो काउंटी क्रिकेट खेळू लागला. काउंटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामात त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ डावांमध्ये ससेस्कसाठी ५३१ धावांचे योगदान दिले आहे. या धावा त्याने १३२.७५च्या सरासरीने केल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन द्विशतकांचा देखील समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार राजस्थान रॉयल्सला झटका, अर्ध्यातून मॅच विनर फलंदाजाची घरी रवानगी
कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय