पुणे । पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत शो-जंपिंगमध्ये नॉर्मल प्रकारात चिन्मय मसुरकर व फॉल्ट अँड आऊट प्रकारात गौरव लोणकर, आशिष डांगे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. तर, ड्रसाज कन्फाईंड प्रकारात अनिरुद्ध मोहिरे याने अव्वल गुण मिळवित स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक पटकाविले.
दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा सुरु आहे. शो-जंपिंग नॉर्मल प्रकारात ज्युनियर गटात चिन्मय मसुरकर (४० से.) प्रथम, धवलसिंह माने (४१ से.) द्वितीय आणि सोहम फडे (४२ से.) तृतीय क्रमांक मिळविला.
शो-जंपिंग फॉल्ट अँड आऊट ज्युनियर प्रकारात गौरव लोणकर (६० से. व ३२ गुण) प्रथम, विश्वजीत मुळीक (४७ से. व १० गुण) द्वितीय, प्रकाश धोणे (६० से. व १० गुण) तृतीय क्रमांक पटकाविला. चिल्ड्रन प्रकारात आशिष डांगे (३२ से. व १० गुण) सुवर्ण, अनुज जगताप (१८ से. व ६ गुण) रौप्यपदक मिळविले.
ड्रसाज कन्फाईंड प्रकारात अनिरुद्ध मोहिरे (११६ गुण) आणि रोहित प्रताप थोरात (९८.५) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय तर, अनिरुद्ध मोहिरे (९६ गुण) व धवलसिंग माने (९६ गुण) यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
अनिरुद्ध मोहिरे याने दोन वेगवेगळ्या घोडयांवरुन ड्रसाज प्रकारात सहभाग घेत पदकांची कमाई केली. अनिरुद्ध मोहिरे हा पुण्यातील दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमीमध्ये गेली १० वर्षांपासून शिकत आहे. सध्या तो इयत्ता ११ वी मध्ये स.प.महाविद्यालयात शिकत आहे.
इतर निकाल
पोल बेंडिंग।
वयोगट १० ते १२ वर्षे – श्रद्धा वानवे (प्रथम), राजकुंवर मोहिते (द्वितीय), सिद्धी टाकळकर (तृतीय), वयोगट १२ ते १८ वर्षे – संस्कार हिंदोळे (प्रथम), श्रेयस करपे (द्वितीय), अलिशा मोरे (तृतीय), ज्युनियर गट – धवलसिंह माने (प्रथम), अजिंक्य शिंदे (द्वितीय), संस्कृती क्षीरसागर (तृतीय).
कार्टन रेस ।
वयोगट १० ते १२ वर्षे – अनुज जगताप (प्रथम), रुहान अग्रवाल (द्वितीय), सिद्धी टाकळकर (तृतीय), वयोगट १२ ते १८ वर्षे – श्रेयस करपे (प्रथम), मिहिका अमृते (द्वितीय), अलिशा मोरे (तृतीय), ज्युनियर गट – मयुरी पवार (प्रथम), तन्मय मोरकर (द्वितीय), संस्कार मोरे (तृतीय).