पुणे सेव्हन एसेसकडून चिराग शेट्टी आणि हेंद्र सेतीआवानची चमक

हैदराबाद। पुणे सेव्हन एसेस संघाने चिराग शेट्टी आणि हेंद्र सेतीआवानने तर, पुरुष एकेरीत काझुमासा सकाई चमकदार कामगिरी करत स्टार स्पोर्ट्स प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यसामन्यात चमक दाखवली.

हैदराबाद येथे सुरू असलेल्या उपांत्यफेरीतील दुसऱ्या सामन्यात पुरुष दुहेरीच्या लढतीत पुणे सेव्हन एसेस संघाने चिराग शेट्टी आणि हेंद्र सेतीआवानने जोडीने बंगळुरू रॅपटर्स अरुण जॉर्ज व रिआन अगुंग सापुत्रो जोडीवर 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.चिराग शेट्टी आणि हेंद्र सेतीआवानने पहिल्या गेममध्ये 15-12 असा विजय मिळवत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये 15-10 अशी चमक दाखवत सामन्यात विजय नोंदवला.

Related Posts

पुरुष एकेरीच्या बंगळुरू रॅपटर्सच्या ब्राईस लेव्हरडेजने पुणे सेव्हन एसेसच्या मिथुन मंजुनाथवर 2-1 असा विजय मिळवला. ब्राईसने पहिला गेम 15-14 असा आपल्या नावे करत आघाडी घेतली.मिथुन मंजुनाथने दुसरा गेम 15-9 असा आपल्या नावे करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये लेव्हरडेजने आपला खेळ उंचावत गेम 15-6 अशी आघाडी घेत सामना जिंकला.

पुणे सेव्हन एसेस संघाकडून काझुमासा सकाईने बी साई प्रणितवर 2-0 असा विजय नोंदवला.पहिला गेम काझुमासा सकाईने 15-11 असा आपल्या नावे करत आघाडी घेतली. दुसरा गेम 15-13 असा जिंकत विजय मिळवला.

You might also like