काय सांगता! भारत-न्यूझीलंड कसोटीदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होता ख्रिस गेल

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे काल(22 फेब्रुवारी) वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित होता.

त्याला भारत-न्यूझीलंड कसोटी दरम्यान पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या सायमन डौलने गेलच्या उपस्थितीमागील कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की गेल वेलिंग्टनला एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सामील होण्यासाठी आला आहे.

त्याला स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांमध्येही कुतुहल दिसून आले. त्याच्या स्टेडियममधील उपस्थितीदरम्यानचे अनेक फोटोही नंतर व्हायरल झाले.

 

भारत – न्यूझीलंड सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 165 धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 348 धावा करत 183 धावांची आघाडी घेतली आहे.

You might also like