वेस्ट इंडिजचा ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल पुन्हा एकदा टी20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. गेल 15 डिसेंबर पासून अमेरिकेत सुरू होणार्या यूएस ओपन टी20 क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार आहे. या स्पर्धेचा हा बारावा हंगाम आहे. ख्रिस गेल अटलांटा परमवीर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आयपीएलनंतर गेलने दुखापतीमुळे कोणत्याच टी20 स्पर्धेत भाग घेतला नव्हता. गेलने दुखापतीमुळे लंका प्रीमियर लीग मधूनही माघार घेतली होती. गेल सोबतच नुकतीच न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला कोरे एँडरसनही या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
आयपीएलमधील गेलची कामगिरी
गेल हा यंदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य होता. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात गेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नव्हते. परंतु त्याला नंतर संधी मिळाल्यावर त्याने आपल्या बॅटने धावांचा वर्षाव केला. ख्रिस गेलने 7 सामन्यात 41 पेक्षा अधिक सरासरीने 288 धावा काढल्या. या धावा करताना त्याने 3 अर्धशतकेही ठोकली होती. यावेळी त्याने 137 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करताना 23 गगनचुंबी षटकार ठोकले होते.
टी20 चा बादशहा
आतापर्यंत ख्रिस गेलने 411 टी20 सामन्यात 38.26 च्या सरासरीने सर्वाधिक 13584 धावा काढल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वोच्च धावसंख्या (175) उभारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याचबरोबर त्याने या प्रकारात सर्वात जास्त 22 शतके ठोकली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये खेळताना त्याने 30 चेंडूत शतक ठोकले होते. त्याचबरोबर या प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक हजार षटकार लगावले आहेत. इतर कोणताही फलंदाज त्याच्या या विक्रमाजवळ नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
विराट! शेतकरी मोर्चात सहभागी हो, चिडून चाहत्याने केले आवाहन
पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी ‘हा’ संघ करणार पाकिस्तान दौरा
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात